शनिवार, 20 एप्रिल 2024
  1. मराठी बातम्या
  2. आज-काल
  3. मंथन
Written By
Last Modified: गुरूवार, 15 सप्टेंबर 2016 (12:24 IST)

पहिलंदा सहा तर आता आठ मुलांना जन्म

आतापर्यंत तुम्ही जुळे किंवा तिळे मुलांबाबत ऐकलं असेल पण कॅलिफोर्नियामध्ये नेटली सुलेमानने 2009 मध्ये एकसोबत 8 मुलांना जन्म दिला होता. यानंतर ती खूपच प्रसिद्ध झाली होती. टीव्ही चॅनल, चॅट शो आणि रेडिओ शो मध्ये नेटलीचा उल्लेख होऊ लागला. 
 
पण काही दिवसानंतर ती वादात सापडली आणि मग काही दिवस गायबच झाली.
 
नेटलीने तिची लाइफस्टोरी शेअर केली आहे. नेटली म्हणते की, आयवीएफ ट्रीटमेंटने तिने 8 मुलांना जन्म दिला. या आधीही तिने याच ट्रीटमेंटने 6 मुलांना जन्म दिला होता. पण त्यानंतर ती अडचणीत आली होती.
 
नेटली म्हणते की, माझ्याकडे काम नव्हतं. ज्यामुळे मुलांचा सांभाळ करणं कठीण झालं होतं. आजूबाजूचे लोक वाईट बोलू लागले त्यामुळे मानसिक त्रास झाला. 14 मुलांची आई नेटलीने पॉर्न फिल्ममध्ये देखील याआधी काम केले होते. पण मुलं झाल्यानंतर तिने हे काम सोडून दिलं. 
 
नेटलीला मीडिया आउटलेट्सने न्यूड पोझसाठी 67 लाख रुपयांची ऑफर केली होती. त्यानंतर तिने दोन-तीन मीडिया कंपनीसाठी न्यूड फोटोशूट केलं होतं.