गुरूवार, 25 एप्रिल 2024
  1. मराठी बातम्या
  2. आज-काल
  3. मंथन
Written By
Last Modified: शनिवार, 4 जुलै 2015 (13:53 IST)

पिल्लासाठी सापाशी थरारक लढाई (पहा व्हिडिओ)

कुठलेही आई-वडील आपल्या पोटच्या मुलाला वाचवण्यासाठी प्राणाची आहुती द्यायलाही तयार असतात. जसं हे माणसांमध्ये असतं, तसंच मुक्या प्राण्यांमध्येही. मुके प्राणीही आपल्या पिल्लांना संकटकाळी वाचवण्याचा शर्थीचे प्रयत्न करत असतात. अशीच काहीशी घटना समोर आली आहे.
 
एका सशाने आपल्या पिल्लाला वाचवण्यासाठी आपल्या प्राणाची पर्वा न करता सापाशी दोन हात केले. सशाच्या पिल्लाला एकटं पाहून साप त्याच्याजवळ गेला. मात्र, ज्यावेळी ससा परतला, तेव्हा त्याने पिल्लाजवळ सापाला पाहिले.. आणि मग सुरु झाली पिल्लाच्या बचावाची लढाई.
 
सापाला पिल्लापाशी पाहिल्यावर कसलाही विचार न करता सशाने त्याच्यावर उडी मारली आणि चावे घेण्यास सुरुवात केली. त्यानंतर सापाने तिथून पळ काढला. मात्र तरीही सशाने त्याचा पाठलाग करुन त्याचे चावे घेण्याचा प्रयत्न केला. हा व्हिडिओ इंटरनेटवर तुफान व्हायरल झाला आहे. 
 
यू-टय़ूबवर आतापर्यंत साडे बारा लाखांहून अधिक प्रेक्षकांनी हा व्हिडिओ पाहिला आहे.