गुरूवार, 25 एप्रिल 2024
  1. मराठी बातम्या
  2. आज-काल
  3. मंथन
Written By

पृथ्वीवरील सर्वात रहस्यमय ठिकाणे

आपले जग म्हणजे अनेक रहस्यांचे माहेरघर आहे. यामधील रहस्ये उलगडण्याचा नेहमीच प्रयत्न केला जातो. अशीच काहीशी रहस्यमयी ठिकाणे पृथ्वीवरही आहेत. मात्र, या ठिकाणांचे रहस्य आजपर्यंत कोणालाच उलगडलेले नाही.... 
 
1) सॅन लुईस व्हॅली
 
अमेरिकेतील कोलारॅडो राज्यात हे ठिकाण आहे. हे ठिकाण 116 किलोमीटर लांब आणि 119 किलोमीटर रूंद आहे. या भागात सातत्याने अनोख्या आकृत्या दिसून येतात. तसेच जनावरांना मारले जाते तर काहीचे अवयव गायब असतात. घाव दिसतो; पण रक्त सांडलेले दिसत नाही.
 
पुढे पहा बर्म्युडा ट्रँगल
2) बर्म्युडा ट्रँगल
 
ब्राझील किनारपट्टीपासून सुमारे 300 किलोमीटर लांब अंतरावर असलेल्या या ठिकाणाचे क्षेत्रफल 13 ते 14 लाख चौरस किलोमीटर आहे. आतापर्यंत या भागात मोठ्या संख्येने विमाने व जहाजे गायब झाली आहेत. रेडिएशनच्या विसंगतीने असे होते, असे मत शास्त्रज्ञांचे आहे. 
 
पुढे पहा  बेनिनिंगटन ट्रँगल
3) बेनिनिंगटन ट्रँगल
 
हे ठिकाण अमेरिकेतील ग्लासटेनबरी माऊंटन परिसरातील मध्यभागात आहे. या भागात नेहमीच मोठे पाय असलेल्या मानवी आकृत्या दिसून येतात. तसेच विचित्र आवाजसह प्रखर प्रकाशही दिसून येतो. अमेरिकंस या भागाला शापित भाग म्हणून समजतात.
 
पुढे पहा  मिशिगन ट्रँगल
4) मिशिगन ट्रँगल
 
हे ठिकाण अमेरिकेतील पाच मोठ्या सरोवरांपैकी एक आहे. ते 307 मैल लांब व 188 मैल रूंद आहे. या सरोवरात आतापर्यांत 40 विमाने गायब झाली आहेत ही विमाने कशी गायब झाली, हे गूढ अद्यापही कायम आहे. याशिवाय येथे रहस्यमयी आकृत्या सातत्याने दिसून येतात. 
 
पुढे पहा एंगिकुनी लेक
5) एंगिकुनी लेक
 
हे ठिकाण कॅनडातील कैजान नदीनजीक आहे. हे एक मोठे सरोवराचे स्थळ आहे. असे म्हटले जाते की, 1930 मध्ये या सरोवराच्या किनारी वसलेल्या गावातील सुमारे 2 हजारांहून अधिक लोक अचानक गायब झाले. त्यांचा अद्यापही थांगपत्ता लागू शकला नाही.