शुक्रवार, 29 मार्च 2024
  1. मराठी बातम्या
  2. आज-काल
  3. मंथन
Written By
Last Modified: सोमवार, 12 ऑक्टोबर 2015 (12:38 IST)

पॉर्न सर्चमध्ये भारतीय अधिक

‘पॉर्न’ सर्चमध्ये भारतीय शहरांनी गुगल ट्रेंडमध्ये आघाडी घेतली आहे. देशात ‘पॉर्न’ बंदी असावी की नसावी यावर चर्चा होत असताना ‘पॉर्न सर्च’मध्ये जगातील 10 पैकी सात शहरे भारतातील आहेत. देशाची राजधानी दिल्लीत सर्वाधिक ‘पॉर्न सर्च’ केला जातो. त्यानंतर क्रमांक लागतो महाराष्ट्रातील पुण्याचा. भारतातील सातपैकी दोन शहरे महाराष्ट्रातील आहेत. या यादीत पुण्याबरोबरच मुंबईचादेखील समावेश आहे.सर्वाधिक ‘पॉर्न सर्च’ करणार्‍या शहरांमध्ये दिल्ली, पुणे, मुंबई, हावडा, बंगळुरू या शहरांचा समावेश आहे. महाराष्ट्राची सांस्कृतिक राजधानी अशी ओळख असणार्‍या पुण्याची ‘पॉर्न सर्च’मधील आघाडी धक्कादायक आहे. पुण्यातील नेट युजर्सना केवळ पॉर्न पाहण्यात नव्हे तर ‘अँनिमल पॉर्न’ पाहण्यात अधिक रस असल्याचे गुगल ट्रेंडच्या आकडेवारीमधून पुढे आले आहे. देशात सर्वाधिक ‘अँनिमल पॉर्न’ पुण्यात पाहिले जाते. 2008 पासून आतापर्यंत यात सातत्याने वाढ होत असल्याचे गुगल ट्रेंडने म्हटले आहे. पुण्यात पाठोपाठ दिल्ली, मुंबई आणि बंगळुरूमधील नेट युजर्स ‘अँनिमल पॉर्न’ पाहण्यात रस आहे. त्याच प्रमाणे ‘रेप पॉर्न’ पाहण्यात कोलकाता शहर पहिल्या क्रमांकावर आहे. तर उत्तरप्रदेशमधील छोटे शहर असलेले उन्नावमध्ये लहान मुलांचा पॉर्न सर्वाधिक पाहिला जातो. भारतातील इंटरनेट युजर्सची संख्या पाहता ही आकडेवारी अचूक असेलच असे नाही, असे मत क्रिप्टोग्रॉफी तज्ज्ञ अजित हट्टी यांनी व्यक्त केले. गुगल ट्रेंडमध्ये युजर्सची नेमकी संख्या सांगितलेली नाही. त्याचबरोबर जगातील अनेक देशात गुगल सर्च वापरले जात नाही. त्यामुळे चीन, रशिया, दक्षिण कोरिया आदी देशातील युजर्सची माहिती यात नाही. तर अमेरिका आणि इंग्लंडसारख्या देशात गुगलसह अन्य सर्च इंजिनचा वापर मोठय़ा प्रमाणात केला जातो. गुगल ट्रेंडमध्ये एका विशिष्ट युजर्सकडून सर्च केले जाणारे सर्च दाखवण्यात आल्याचे हट्टी यांनी सांगितले. इंटरनेट साक्षरतेचे कमी प्रमाण आणि भाषा कौशल्याचा अभाव यामुळेदेखील पॉर्न सर्च अधिक होत. भारतातील अनेक युजर्स ‘पॉर्न’ असा शब्द सर्च करून पॉर्न वेबसाइट पाहतात. तर विकसित देशातील इंटरनेट युजर्स थेट पॉर्न वेबसाइटला भेट देतात. त्यामुळेच इंटरनेट साक्षरता आणि भाषा कौशल्याचा अभाव यामुळे ट्रेंडमध्ये भारतीयांची संख्या अधिक दिसत आहे.