शनिवार, 20 एप्रिल 2024
  1. वृत्त-जगत
  2. आज-काल
  3. मंथन
Written By
Last Modified: बँकॉक , मंगळवार, 18 नोव्हेंबर 2014 (12:17 IST)

भर बाजारातून जाते रेल्वे!

सध्या जागतील अनेक देश बुलेट ट्रेनचा विचार करीत आहेत, पण कराही देशांमध्ये अजूनही चमत्कारिक स्थितीमधील रेल्वे पाहायला मिळते. थायलंडमध्ये अशीच एक रेल्वे भर बाजारातून डुलत डुलत जाते! या झुक झुक गाडीला भाजी विक्रेतेही काही वेळापुरती वाट करून देतात. 
 
थायलंडच्या मॅकलाँग मार्केटमधून ही रेल्वे जाते. हा रेल्वेमार्ग एक आश्चर्यच आहे. मार्केटमध्ये रेल्वेच्या रुळांजवळच लोकांनी आपली भाजीची दुकाने थाटलेली असतात. भाज्यांबरोबरच मासे, अंडी आणि अन्य सामानही विकले जाते. अनके टोपल्यांमधून अशश वस्तू भरून त्या रुळाजवळच ठेवलेल्या असतात. अगदी अरुंद वाटेने ही रेल्वे जात असताना लोक सहजपणे आपले साहित्य आवरून अंग चोरून उभे राहतात!