बुधवार, 24 एप्रिल 2024
  1. मराठी बातम्या
  2. आज-काल
  3. मंथन
Written By
Last Modified: शनिवार, 5 सप्टेंबर 2015 (11:51 IST)

भारतीय बनावटीच्या दागिन्यांची पाकिस्तानात क्रेझ

भारत आणि पाकिस्तान या शेजारी देशांत आपसातील राजकीय संबंध कसेही असले तरी त्याचा परिणाम भारतीय उत्पादनांवर फारसा होताना दिसत नाही. याचे मोठे उदाहरण म्हणजे भारतीय चित्रपटांना पाकिस्तानात मिळत असलेली लोकप्रियता आहेच पण त्याचबरोबर भारतीय बनावटीचे दागिनेही पाकिस्तानी लोकांना भुरळ घालत आहेत.
 
आऊट हाऊस आणि प्रेटरे यासारख्या बडय़ा ब्रँडेड दागिने कंपन्यांना पाकिस्तानात खूपच लोकप्रियता आणि लोकाश्रय मिळताना दिसत आहे. काही महिन्यांपूर्वी लाँच झालेल्या या ब्रँडनी पाकिस्तानात विक्रीचे रेकॉर्ड केले आहे. फातिमा अहमद सांगतात, ङ्खॅशनचा विचार केला तर भारतीय आणि पाकिस्तान्यांची आवड जवळजवळ समान आहे. त्यात बॉलिवूडची क्रेझ खूप आहे आणि त्यातील नटय़ा परिधान करत असलेले दागिने पाकिस्तानातही लोकप्रिय होतात. आऊट हाऊस व प्रेटरेसारख्या ब्रँडचे दागिने 4 हजारांपासून 30 हजारांच्या दरम्यान आहेत त्यामुळे ते सहज परवडणारे आहेत. यांचा खप इतका प्रचंड आहे की नवीन माल आला की काही दिवसांतच तो संपतो त्यामुळे या दागिन्यांचा पुरवठा वाढविणे भाग पडते आहे.