शुक्रवार, 29 मार्च 2024
  1. वृत्त-जगत
  2. आज-काल
  3. मंथन
Written By
Last Modified: मंगळवार, 7 एप्रिल 2015 (15:50 IST)

मंगळ ग्रहावर पुन्हा मिळाले पाणी असल्याचे पुरावे

मंगळ ग्रहावर पाणी असल्याचे शास्त्रज्ञांना पुन्हा एकदा पुरावे सापडले आहेत. जिऑलॉजिकल सोसायटी ऑफ अमेरिका या पत्रिकेत छापलेल्या माहितीनुसार, मंगळ ग्रहाच्या क्रेटर युक्त उत्तरी भागात असलेल्या अरबिया टेरा येथे

मंगळाच्या भूमध्यरेखीय पठारीय भागाचे सर्वेक्षण करण्यात आले आहे.

या ठिकाणाची निर्माण प्रक्रिया आणि तेथे मानवी जीवनास अनुकूल वातावरणाची शक्यता शास्त्रज्ञ तपासून पाहात आहेत. मंगळ ग्रहाच्या पठारी भागात स्थित असलेला भूमध्यरेखीय पठाराचा भाग अनेक उंचवटीय भाग,

एकसारख्या स्तरावरील तसेच एक दुसर्‍यावर तिरप्या पद्धतीने पसरलेल्या रेतीच्या भूभागाने बनलेला आहे.

शास्त्रज्ञांनी सांगितले की, या भूमध्यरेखीय उभार असलेल्या या भागाची निर्माण प्रक्रिया भूमिगत पाण्याच्या स्तराच्या चढ-उतारामध्ये महत्त्वाची भूमिका बजावते. पठारावर निर्माण झालेले उंचवटे हे छोट्या छोट्या पाण्याच्या

फवार्‍यांनी बनले आहेत, असे शास्त्रज्ञांचे मानणे आहे.