शनिवार, 20 एप्रिल 2024
  1. वृत्त-जगत
  2. »
  3. आज-काल
  4. »
  5. मंथन
Written By वेबदुनिया|

मंगळाच्या पृष्ठभागावर पाण्याच्या खाणाखुणा

WD
मॉल्यूक्युलर हायड्रोजन, कार्बन डायऑक्साइड आणि पाण्यामुळे मंगळ ग्रहावर हरितगृह वायूचे वातावरण तयार झाले. या वायूमुळे 3.8 अब्ज वर्षापूर्वी मंगळाच्या तापमानात मोठी वाढ झाली.

यामुळे निर्माण झालेल्या स्थितीत मंगळावर पाणी प्रवाह सुरू झाला, असे संशोधनात आढळून आले आहे. कार्बन डायऑक्साइड, पाणी आणि हायड्रोजनच्या वापरातून मंगळ ग्रहावरील वातावरणाचे मॉडेल तयार करण्यात आले.

याच्या अभ्यासातून 3.8 अब्ज वर्षापूर्वी मंगळावर पाणी प्रवाह सुरू होता, असा निष्कर्ष काढण्यात आला आहे. 3.8 अब्ज वर्षापूर्वी मंगळ ग्रहाची थंड तापमानावरील स्थिती पाणी प्रवाह होण्यास कारणीभूत ठरली. यामुळे प्राचीन काळात मंगळावर पश्चिम अमेरिकेतील ‘ग्रॅँड कॅनयन स्नेक’सारखे ‘नानेदी’ खोरे विकसित झाले, असा दावा संशोधकांनी केला आहे. मंगळ ग्रहाच्या उष्ण तापमानाचे रहस्य आणि त्यातील प्राचीन खोर्‍याच्या अस्तित्वाबाबत शास्त्रज्ञ गेल्या 30 वर्षापासून संशोधन करत असल्याचे रामसेस एम. रामीरेझ यांनी सांगितले.

रामीरेझ यानी पेन्न स्टेट युनिव्हर्सिटीतील प्रो. जेम्स कास्टिंग यांच्यासोबत संशोधनकार्य केले आहे.

मंगळाबाबतचे रहस्य उलगडण्यात आम्ही यशस्वी ठरू, असा दावा त्यांनी केला. उल्कापिंड मंगळावर धडकल्यानंतर तेथे खोरे अस्तित्वात आल्याचा दावा आणखी एका संशोधनात करण्यात आला आहे.