गुरूवार, 25 एप्रिल 2024
  1. वृत्त-जगत
  2. »
  3. आज-काल
  4. »
  5. मंथन
Written By वेबदुनिया|

मराठी माणूस भांडकुदळ आहे काय?

दाक्षिणात्यांच्या वाढत्या वर्चस्वाविरोधात बाळासाहेबांच्या शिवसेनेने आवाज उठवला नि त्यांना टार्गेट केले गेले. तत्पूर्वी, संयुक्त महाराष्ट्राच्या आंदोलनात गुजराती समाजाबरोबरही भांडण निघाले. आता राज ठाकरे उत्तर भारतीयांविरोधात तेच करताहेत. कर्नाटकाशी तर राज्याच्या जन्मापासून भांडतोय. कधी दाक्षिणात्य, कधी उत्तर भारतीय, कधी गुजराती-मारवाडी. कधी कानडी. या सगळ्या पार्श्वभूमीवर मराठी माणसाची प्रतिमा राष्ट्रीय पातळीवर भांडकुदळ म्हणून होते आहे काय?

याचा अर्थ मराठी माणूस स्वतःच्या हक्कांविषयी जास्त जागरूक आहे की स्वतःभोवती रिंगण घालून तो जास्त संकुचित होऊ पहातो आहे? या संकुचितपणामुळेच तो इतरांना दूर लोटू पहातो आहे काय? देश स्वतंत्र व्हावा म्हणून मराठी लोकांचे योगदान इतरांपेक्षा मोठे होते हे कुणीही नाकारणार नाही. पण मग आता आपला प्रांत डोळ्यासमोर ठेवून इतरांशी भांडण उकरून काढण्यातही आपणच जबाबदार आहोत काय? उत्तरेपासून दक्षिणेपर्यंत सगळ्यांशीच आपली भांडणे होत आहेत. याचा अर्थ मराठी माणूस खरंच भांडकुदळ आहे काय? तुम्हाला काय वाटतं? हे खरंय की खोटं? मग आपली प्रतिक्रिया खाली नोंदविण्यास विसरू नका.