शुक्रवार, 26 एप्रिल 2024
  1. वृत्त-जगत
  2. आज-काल
  3. मंथन
Written By
Last Modified: शुक्रवार, 29 मे 2015 (14:40 IST)

मुंबईतील प्रत्येक हॉटेलात मिळणार महाराष्ट्रीयन पदार्थ

वडा पाव, मिसळ, पोहे, साबुदाणा खिचडी, थालिपीठ हे खास महाराष्ट्रीय पदार्थ आता मुंबईतील सर्व हॉटेलमध्ये उपलब्ध करून दिले जातील, असे आश्वासन इंडियन हॉटेल व रेस्टॉरंट असोसिएशनचे अध्यक्ष आदर्श शेट्टी यांनी आरपीआयचे अध्यक्ष रामदास आठवले यांना दिले आहे.
 
मिळालेल्या माहितीनुसार या असोसिएशनच्या प्रतिनिधींनी रामदास आठवले यांची त्यांच्या संविधान बंगल्यावर भेट घेतली तेव्हा आठवले यांनी मुंबईतील सर्व हॉटेलात महाराष्ट्रीय पदार्थ उपलब्ध करून दिले पाहिजेत असे सांगितले व हे झाले नाही तर त्यांचे कार्यकर्ते आंदोलन पुकारतील असेही बजावले. त्यावर शेट्टी यांनी या आठवडय़ापासूनच महाराष्ट्रीय पदार्थ सर्व्ह केले जातील असे सांगून तसे आदेश संघटनेच्या सर्व सभासदांना दिले जातील असे आश्वासन दिले. इतकेच नव्हे तर शिवाजी पार्कवरील जिप्सी हॉटेलात आठवले यांना कांदा पोहे खायला घातले असेही समजते.
 
महाराष्ट्रीय पदार्थ मेनूत समाविष्ट करण्यासाठी हॉटेल मालकांना मेनू कार्डे बदलावी लागणार आहेत. मात्र मुंबई, ठाणे भागात जवळजवळ प्रत्येक ठिकाणी रिपब्लिकन पक्षाच्या कार्यकर्त्यांची फौज आहे व पदार्थ उपलब्ध झाले नाहीत तर ते हॉटेलसमोर आंदोलन करणार असल्याने तातडीने मेनू कार्ड बदलण्याचा निर्णयही घेतला गेला असल्याचे समजते.