शनिवार, 20 एप्रिल 2024
  1. मराठी बातम्या
  2. आज-काल
  3. मंथन
Written By
Last Modified: सोमवार, 24 ऑगस्ट 2015 (11:12 IST)

यादी न देता परदेशातून 25 हजारांपर्यंत किमती वस्तू आणा

परदेशातून भारतात प्रवेश करणार्‍यांना 25 हजारांपेक्षा कमी किमतीच्या वस्तू जाहीर करण्याची गरज नाही. कस्टम बॅग्स डिल्करेशन अँक्टमध्ये करण्यात आलेले बदल केंद्रीय अर्थमंत्र्यांनी लागू केलेत. या आधी भारतात येणार्‍या प्रत्येकाला 10 हजारांच्या वरच्या वस्तूंची यादी जाहीर कस्टम विभागाला द्यावी लागत असे. आता नव्या नियमानुसार ही रक्कम वाढवण्यात आलीय. पण भारतीय चलनात 25 हजार किमतीपेक्षा जास्त इलेक्ट्रॉनिक वस्तूंसाठी वेगळा फॉर्म भरून द्यावा लागणार आहे. त्यात प्रामुख्यानं एलसीडी आणि एलईडी टीव्हीचा समावेश आहे. याशिवाय गेली 10 वर्षे भारतात वास्तव्याला असणार्‍या नागरिकांना चीन, नेपाळ, भूतान आणि म्यानमारमधून येताना 45 हजारांपर्यंतच्या वस्तू जाहीर न करता आणता येणार आहेत.