गुरूवार, 25 एप्रिल 2024
  1. वृत्त-जगत
  2. »
  3. आज-काल
  4. »
  5. मंथन
Written By वेबदुनिया|

ये दोस्ती हम नही छोडेंगे

NDND
लहानपणी मैत्री फार चटकन होते. भांडणेही तितकीच होतात. ती मिटतातही तितक्याच लवकर. त्यामुळे कट्टी-बट्टी लहानपणी सुरूच असते. पण मोठेपणी मात्र असे काय होते कोण जाणे की तुटलेली मैत्री सांधणे अवघड होते. मैत्रही लवकर जुळत नाही. म्हणूनच आयुष्याच्या शेवटी अनेक जण आयुष्य गेलं तरी चांगला मित्र मिळाला नाही, असे म्हणताना दिसतात. खरोखरच आयुष्यात एका चांगल्या मित्राची कमतरता नेहमी जाणवते. आपल्याला मित्र नसल्यास वा मित्र करण्यात आपण कमी पडत असल्यास त्यासंदर्भात आपण गांभीर्याने विचार करायला हवा. नेमक्या कोणत्या कारणामुळे आपण मित्र जोडू शकत नाही. कोणते कारण दूर केल्यास आपली मैत्री चटकन होऊ शकते याचा विचार केला पाहिजे. त्याचवेळी मैत्री करण्यात सर्वांत मोठी अडचण म्हणजे अहंकार. तो सोडला की मैत्री कधी झाली ते कळणारही नाही.

आपली दोस्ती का होऊ शकत नाही?
NDND
स्वतःला सादर करणे जमायला हवे. छोट्या किंवा मोठ्या गटात वा समूहात आपण रहात असाल तर केवळ हाय हॅलोपुरते सीमीत राहू नका. अभिवादन केल्यानंतरही पुढेही काही बोला. हाय हॅलोपुरतेच बोलणे राहिले तर मैत्रीचे गाडे तिथेच अडून राहील. पुढे सरकरणार नाही (आणि हो एखाद्याला सॉरी म्हटल्यामुळे मैत्री प्रस्थापित होत असेल तर तसे करायला आपला अहंकार आड आणू नका.)

कान हलके नको
दुसऱ्यांनी सांगितलेल्या गोष्टींवर सहज विश्वास ठेवू नका. त्या आधारे एखाद्यविषयीचे मत ठरवू किंवा बदलू नका. एखाद्याने सांगितलेल्या अशा गोष्टींच्या आधारे मित्रावर अविश्वास दाखविणे, त्याच्यापासून दूर रहाणे, त्याच्याविषयी ऐकलेल्या बाबींची खातरजमा न करून घेणे, गैरसमज बाळगणे हे सारे सोडून द्या.

पोटात काही साठवून ठेव
याच्याकडून ऐकलेले त्याला सांगणे, एका मित्राचे रहस्य दुसऱ्यापुढे उघड करणे, या बाबी मैत्री तुटायला कारणीभूत ठरतात. त्यामुळे त्या टाळा.

विद्वान असल्याचा आ
NDND
मित्रांसमोर मी पणा सोडून द्या. त्यांच्यापुढे मी किती हुषार आहे, हे सांगणेही सोडून द्या. सतत आपली बुद्धिमत्ता, पद वा आपले यश या विषयी बोलू नका. स्वतःला इतरांपेक्षा श्रेष्ठ दाखविण्याचा प्रयत्न करू नका.

वाद घालू नक
वाद घालण्याच्या स्वभावामुळे भांडणे होतात व त्यामुळे अर्थातच मैत्री तुटते. त्यामुळे भावनांवर नियंत्रण ठेवा. मित्राने सांगितलेली प्रत्येक बाब तर्काच्या कसोटीवर घासणे किंवा त्याच्यावर काहीतरी तिरकस कॉमेंट करणे सोडून द्या.

सकारात्मक दृष्टिकोन ठेव
NDND
सहज सांगितलेल्या गोष्टी किंवा गमती गमतीत एखाद्याची टोपी उडवल्यास ती गांभीर्याने घेऊ नये. एखाद्याने सांगितलेल्या गोष्टीचा चुकीचा अर्थ काढू नये. प्रत्येक बाबीवर टोकणे, चीडचीड करणे, इगोचा मुद्दा करणे यामुळे मैत्रीत दरी पडते.

स्वार्थ सोड
मैत्री असते तिथे स्वार्थाला स्थान नसते. अनेक जण स्वार्थासाठीही मैत्री करतात. त्याला मैत्री म्हणता येणार नाही. मैत्री स्वार्थापलिकडे असते.

मैत्री टिकविण्याच्या टिप्
मैत्रीमध्ये स्नेह, त्याग व समर्पण असायला हवे.
मदतीसाठी नेहमी तयार रहा
मित्राची मनस्थिती समजून घ्या. त्याच्याकडून अतिअपेक्षा ठेवू नका.
पैशांच्या देवाणघेवाणी सावधगिरी बाळगा.
योग्य सल्ला द्या. मित्रांना चुकीच्या सवयीपासून दूर ठेवण्याचा प्रयत्न करा.
प्रॅक्टिकल एप्रोचऐवजी इमोशनल एप्रोच बाळगा.
चांगले श्रोते व्हा. त्याचवेळी रहस्य पोटात ठेवायला शिका.

लक्षात ठेवा चांगला मित्र नेहमीच तुमच्या आयुष्यात चांगल्या किंवा वाईट दोन्ही प्रसंगात धावून येईल. म्हणूनच मित्र बनवा आणि त्यांच्याशी चांगले नाते निर्माण करा.