शुक्रवार, 29 मार्च 2024
  1. वृत्त-जगत
  2. »
  3. आज-काल
  4. »
  5. मंथन
Written By वेबदुनिया|

येशू ख्रिस्त विवाहित होते?

WD
अलीकडेच सापडलेल्या एका प्राचीन भोजपत्राच्या जीर्ण खंडात भगवान येशू ख्रिस्त हे विवाहित असावेत, असे संकेत मिळाले आहेत. या भोजपत्रावरून आता नवा वाद निर्माण होण्याची शक्यता आहे.

प्रथम पृष्ठावर केवळ आठ ओळी आणि मागच्या पृष्ठावर केवळ सहा ओळींचा उल्लेख असलेला हा खंड चवथ्या शतकातील असून, त्यावर भगवान येशू आणि त्यांच्या अनुयायांमध्ये झालेला संवाद कॉप्टीक भाषेत लिहिलेला असल्याचे, वृत्त 'एबीसी न्यूज'ने दिले आहे. या खंडात येशूच्या मुखी 'माझी पत्नी' असा उल्लेख असल्याचे हा खंड शोधून काढणारे हार्वड विद्यापीठाच्या प्राध्यापिका करेन एल. किंग यांनी सांगितले. हार्वडच्या 'यू ट्यूब'वर पोस्ट करण्यात आलेल्या व्हिडिओत किंग यांनी हा खुलासा केला आहे. या खंडातील सर्वात रंजक ओळ 'येशू त्यांना (त्यांचे अनुयायी) माझी पत्नी'.... असे म्हणतात' ही आहे, असे किंग यांनी नमूद केले आहे. त्यापुढची ओळ , 'ती माझी अनुयायी होण्यास सक्षम होईल,'' अशी आहे. येशूंनी पत्नीचा उल्लेख केलेला हा सध्याच्या काळात अस्तित्वात असलेला एकमेव खंड असल्याचे किंग यांनी म्हटले आहे. हा शोध विधिमान्य ठरला, तर तो ख्रिस्ती धर्मीयांच्या विश्वासाला एक मोठा आघात ठरू शकतो.