बुधवार, 24 एप्रिल 2024
  1. मराठी बातम्या
  2. आज-काल
  3. मंथन
Written By

रोज अंघोळ करणे हानिकारक

रोज अंघोळ करून स्वत:ला फ्रेश म्हणून घेणार्‍यांना हे ऐकून आश्चर्य वाटेल की रोज अंघोळ करणे हानिकारक ठरू शकतं. ब्रिटन येथील न्यूजपेपर द सन यातील एका बातमीप्रमाणे दररोज अंघोळ केल्याने मनुष्य आजारी पडू शकतो. 
 
एका शोधाप्रमाणे असे केल्याने शरीरावरील तेल वाहून जातं आणि शरीरासाठी अत्यंत आवश्यक आहे. दररोज स्नान केल्याने त्वचासंबंधी रोग होण्याची शक्यता वाढून जाते.
 
तसे बघायला गेलं तर हे पश्चिम देशांसाठी उपयुक्त आहे कारण तेथे अंघोळीआधी तेल लावण्याची सवय नाही. ते रोज बॉडी ऑयल वापरतं नाही ज्याने रोज अंघोळ केल्याने त्यांच्या अंगावरील तेल वाहून जातं आणि त्वचेवर लाल डाग पडायला लागतात.
 
ऑस्ट्रेलियन कॉलेजच्या एका प्रोफेसरप्रमाणे गरज भासल्यावरच अंघोळ करायला हवी. त्याच्याप्रमाणे मागील 50 वर्षांपासून रोज अंघोळ करणे हे नियम झाला आहे पण पूर्वी लोकं रोज स्नान नव्हते करायचे. आज स्नान करणे आपली गरज असून एक सामाजिक दबाव झाला आहे.