शुक्रवार, 19 एप्रिल 2024
  1. वृत्त-जगत
  2. आज-काल
  3. मंथन
Written By
Last Modified: मंगळवार, 30 सप्टेंबर 2014 (13:59 IST)

रोज पान खाणारा घोडा

इंगलंडमध्ये मालकाबरोबर रोज पबमध्ये जाऊन दारू ढोसणारा घोडा आहे. सुदैवाने आपल्याकडचे (चार पायांचे) घोडे इतके बिघडलेले नाहीत. मात्र इंदूरमध्ये एक घोडा खाऊच्या पानाचा शौकीन आहे. तो रोज राजवाडा चौकातील एका टपरीवर जाऊन ऐटीत पान खातो. 
 
ही पानाची टपरी शहरात बरीच प्रसीध्द आहे. अनेक प्रसिध्द व्यक्तींनीही या ठीकाणी येऊन पान खाल्ले आहे. तिथे हा बादल नावाचा सात महिन्यांचा सफेद घोडाही पान खाण्यासाठी येत असतो. गोलु कश्यप नावाच्या एका व्यापार्‍याच्या हा घोडा आहे. त्याला रोज सकाळी दौड मारण्यासाठी नेले जाते.
 
एकदा त्याला मसाल्याचे पान खाण्यासाठी देण्यात आले होते. ते त्याला इतके आवडले की, तो रोज आपोआपच या ठिकाणी येऊ लागला. अर्थातच त्याचे एका पानाने भागत नाहे. त्याला किमान चार ते पाच विडे द्यावे लागतात मग त्याची 'तबियत खुश' होते.