बुधवार, 24 एप्रिल 2024
  1. मराठी बातम्या
  2. आज-काल
  3. मंथन
Written By
Last Modified: शनिवार, 25 जून 2016 (11:57 IST)

लग्नानंतर वजन वाढण्याचे कारण!

सर्वसाधारणपणे खाण्यापिण्याच्या सवयी, बाहेरचे अधिक खाणे ही वजन वाढण्याची कारणे मानली जातात. मात्र लग्नानंतर हमखास वजन वाढत असल्याचे दिसते. लग्न झाल्यानंतरच्या सुधारलेल्या तब्येतीस आपल्याकडे लग्न मानवल्याचे म्हटले जाते; पण नुकत्याच झालेल्या संशोधनात याबाबत काही वैज्ञानिक खुलासे समोर आलेत..
 
* लग्नानंतर जीवन बदलते असं ऐकायला मिळतं. मात्र शरीरातही इतका मोठा बदल कसा काय होतो. अनेकांना हा प्रश्न असतो की लग्नानंतरच वजन कसे काय वाढते. एका संशोधनानुसार लाईफ स्टाईलमध्ये बदल हे वजन वाढण्याचे कारण असू शकते असे समोर आले आहे. 
 
* संशोधनानुसार, सिंगल्सच्या तुलनेत लग्न झालेले जोडपी ऑर्गेनिक आणि ट्रेड फूडच्या खरेदीवर भर देतात. युनिव्हर्सिटी ऑफ बेसलमध्ये हेल्थ सायकॉलॉजीचे असिस्टंट प्रोफेसर जुट्टा यांच्या मते, दीर्घकाळ नात्यात असणार्‍या व्यक्ती खाण्यापिण्याच्या बाबतीत सजग असतात. 
 
* जगभरात लग्न झालेल्यांचा 'बीएमआय' म्हणजेच बॉडी मास इंडेक्स अधिक असतो. लग्न सोहळ्यादरम्यान जे कार्यक्रम असतात त्याचवेळी त्यांच्या वजनात दोन किलोंनी वाढ होते. 
 
* लग्न झालेली जोडपी सिंगल लोकांच्या तुलनेत चांगले आणि हेल्दी जेवण जेवण्यावर भर देतात. ही जोडपी एकमेकांच्या खाण्यापिण्याकडे लक्ष देतात.