शनिवार, 20 एप्रिल 2024
  1. वृत्त-जगत
  2. »
  3. आज-काल
  4. »
  5. मंथन
Written By वेबदुनिया|

लेटमार्कमुळे नारळ देण्यात भारतीय कंपन्या पुढे

WD
ऑफिसचे मस्टर गाठण्यासाठी आपण सकाळी घाई करतो. लेटमार्क मिळू नये याची काळजी घेतो. अशाप्रकारे कामाला उशीरा जाण्याची सवय केवळ आपल्या भारतीय नागरिकांमध्येच नसली तरी कामावर लेट येणार्‍यांवर कठोर कारवाई करण्यात मात्र हिंदुस्थानी कंपन्या आघाडीवर असल्याचे एका सर्वेक्षणात उघड झाले आहे.

फर्म करियर बिल्डर कंपनीने नऊ देशांमध्ये हे महत्त्वपूर्ण सर्वेक्षण केले. त्यानुसार जगात सर्वात जास्त भारतातील 42 टक्के कंपन्यांनी कार्यालयात उशिरा आल्याने कर्मचार्‍यांना तडकाफडकीने काढून टाकले आहे. लेटमार्क कर्मचार्‍यांना घरचा रस्ता दाखविण्यात भारतानंतर ब्राझील देशाचा दुसरा क्रमांक लागतो. ब्राझीलमध्ये कंपन्यांनी उशिरा येणार्‍या 26 टक्के कर्मचार्‍यांना नारळ दिला. तिसर्‍या क्रमांकावर संयुक्त रूपाने फ्रान्स आणि रशियातील (22 टक्के) कंपन्यांचा क्रमांक लागतो. सर्वेक्षणाच्या अहवालानुसार ब्रिटनमध्ये 21 टक्के कर्मचार्‍यांना कार्यालयात उशिरा आल्याने कायमचे नोकरीचे दरवाजे बंद झाले तर त्यानंतर चीनमध्ये 20 टक्के, जर्मनीत 9 टक्के, जपानमध्ये 7 टक्के आणि इटलीमध्ये 6 टक्के कंपन्यांनी आपल्या लेटलतिफ कर्मचार्‍यांना कामावरून काढले. करिअर बिल्डर इंडियाचे संचालक प्रेमलेश माचमा यांच्या मते जर अलार्म वेळेवर वाजला नाही किंवा ट्रॅफिक जाममध्ये तुम्ही अडकला तर अधिकाधिक बॉस परिस्थिती समजून घेतात. परंतु जेव्हा कामावर उशिरा जाणे ही सवय होऊन जाते तेव्हा ही समस्या होते.