बुधवार, 24 एप्रिल 2024
  1. मराठी बातम्या
  2. आज-काल
  3. मंथन
Written By वेबदुनिया|

लैंगिक संबंधावेळीही येऊ शकतो हृदयविकाराचा झटका!

हृदयविकार असणार्‍या अनेकांना लैंगिक संबंध टाळण्याचा सल्ला दिला जातो आणि तो हितकारकच आहे. याचे कारण म्हणजे आजपर्यंत अनेकांचा, त्यामध्ये काही प्रसिद्ध लोकांचाही समावेश आहे, सेक्सदरम्यानच हृदयविकाराचा झटका येऊन मृत्यू झाला! संशोधकांना असे दिसून आले आहे की, जर 45 लोकांना हृदयविकाराचा झटका येत असेल तर त्यापैकी एकाल असा झटका सेक्सदरम्यानच आलेला असतो.

नेल्सन रॉकफेलर, एरोल फ्लिन, फ्रान्सचे राष्ट्राध्यक्ष फेलिक्स आणि काही प्रसिद्ध धर्मगुरूंचा मृत्यूही असाच झाला आहे. हृदयावर अत्याधिक ताण पडल्याने असा झटका येऊ शकतो. त्यामुळे क्षणिक मोहापायी जीव गमविण्यापेक्षा लोकांनी सावध असलेले बरे, असा सल्ला संशोधकांनी दिला आहे.