मंगळवार, 23 एप्रिल 2024
  1. वृत्त-जगत
  2. »
  3. आज-काल
  4. »
  5. मंथन
Written By वेबदुनिया|

वारसा!

- स्वातंत्र्यवीर सावरकर

WD
वटवृक्षाचे बीज मोहरीहूनही लहान असते,
पण, त्या बिजात जी स्फूर्ती असते,
जी उर्जा असते, जी वल्गना असते
ती वाढता वाढता तिचा प्रचंड वटवृक्ष बनून
त्याखाली गाईची खिल्लारे विसावा घेतात,
उन्हाने श्रान्त झालेल्यांना तो वटवृक्ष सावली देतो
मलाही एक वलग्न् करू द्या!
माझे गाणे मला गाऊ द्या!
या जगात आपणाला जर मानाचे राष्ट्र
म्हणून जगावयाचे असेल तर,
व तसा आपला अधिकार आहे,
तशी सुप्त क्षमता या आपल्या.....
दैदिप्यमान दिव्य राष्ठ्रात खचितच आहे,
फक्त आपल्या सामर्थ्य-स्फु‍‍लिंगावर आलेली
काजळी आणि राख झटकली की
आपले हे राष्ट्र स्वबळावर परमोच्च शिखरावर जाईल!!
या नाही तरी, पुढल्या पिढीत ही वल्गना खरी ठरेल
माझी ही वल्गना खोटी ठरली तर वेडा ठरेन मी
माझी वी वल्गना खरी ठरली, तर प्रेषित ठरेन मी
माझा हा वारसा मी तुम्हास देत आहे!