बुधवार, 24 एप्रिल 2024
  1. वृत्त-जगत
  2. »
  3. आज-काल
  4. »
  5. मंथन
Written By wd|
Last Updated :लंडन , बुधवार, 16 एप्रिल 2014 (16:35 IST)

विवाहित पुरुषांची हाडे असतात मजबूत

'शादी का लड्डू... जो खाए वो पछताए, जो ना खाए वो भी पछताए' असे म्हणून एक संदिग्धता निर्माण केली जाते. मात्र, बारकाईने पाहिले तर विवाहित असणंच अधिक लाभदायक असते. एकाकी जीवन जगण्यापेक्षा वैवाहिक जीवन जगणं अधिक सुखकारक आहे. मानसिक व शारीरिक आरोग्यासाठी तर ही एक आवश्यक बाब ठरु शकते. आता एका संशोधनात असे दिसून आले कि, 25व्या वर्षी विवाह करण्यार्‍या पुरुषांची हाडे अधिक मजबूत असतात.

जे पुरुष दीर्घकाळ वैवाहिक जीवन जगत असतात ते सिंगल किंवा घटस्फोटित पुरुषांच्या तुलनेत अधिक मजबूत असतात. विशेष म्हणजे ही बाब महिलांना लागू होत नाही. डॉ. कॅरोलिन क्रँडल यांनी याबाबतचे संशोधन केले आहे. ते म्हणाले, चांगली जीवनशैली आणि सामाजिक संबंध यासाठीही उत्तम आरोग्य महत्त्वपूर्ण असतो. या संशोधनासाठी 1995 पासून 2005 पर्यंत 25 ते 75 वर्षे वयाच्या पुरुषाची पाहणी करण्यात आली. त्यावर आधारित हे निष्कर्ष काढण्यात आले आहेत.