बुधवार, 17 एप्रिल 2024
  1. वृत्त-जगत
  2. »
  3. आज-काल
  4. »
  5. मंथन
Written By wd|
Last Updated :वॉशिंग्टन , शनिवार, 19 एप्रिल 2014 (16:25 IST)

शनीने जन्म दिला नव्या उपग्रहाला?

नासाच्या कॅसिनी या यानाने शनीच्या कडीजवळ एक छोटा, बर्फाला खगोल शोधला आहे. सुमारे अर्धा मैल व्यासाचा हा खगोल म्हणजे शनीचा नवा चंद्र असावा, असे संशोधकांना वाटते.

या संशोधनामुळे शनीच्या साठपेक्षाही अधिक चंद्रांच्या उत्पत्तीची माहिती संशोधकांना समजू शकते. तसेच पृथ्वी व अन्यही ग्रहांविषयीच तसेच त्यांच्या उपग्रहांविषयीची अधिक माहिती होण्यास मदत होईल. गेल्यावर्षी कॅसिनीवरील एका कॅमेर्‍याने या नव्या चंद्राची छायाचित्रे टिपली आहेत. शनीच्या 'ए' या सर्वात बाहेरच्या व तेजस्वी कडीजवळ हा चंद्र आहे. शनी व त्याचे वीवीध चंद्र यांचे निरिक्षण करण्यासाठी कॅसिनी हे यान सोडण्यात आले होते. या यानाने आतापर्यंत शनीबाबत तसेच त्याच्या टायटनसारख्या अनेक चंद्रांबाबत विविध प्रकारची माहिती व छायाचित्रे पृथ्वीवर पाठवली आहेत. त्यामधून या ग्रहाविषयी व त्याचा चंद्रांविषयी महत्त्वाची माहिती खगोलशास्त्रज्ञांनी मिळाली आहे.