शुक्रवार, 29 मार्च 2024
  1. वृत्त-जगत
  2. »
  3. आज-काल
  4. »
  5. मंथन
Written By वेबदुनिया|

सकारात्मक विचार : आरोग्याची व प्रगतीची गुरुकिल्ली

WD
सकारात्मक विचार, शुभ विचार येणं हा विचारांच्या प्रवासातील महत्त्वाचा टप्पा आहे. नकारात्मक उर्जेच्या पहीतून सुटले तर आपणं उंच भरारी घेऊन आकाशाला गवसणीसुद्धा घालू शकतो. एवढे सामर्थ्य व शक्ती सकारात्मक विचारात आहे.

नकारार्थी विचार करणारा माणूस उपाय शोधण्याऐवजी तो तक्रारच करतो. मी हे करू शकत नाही, मला हे जमणार नाही, मला वेळ नाही, अशा मानसिकतेमुळे तो आत्मविश्वास गमावून बसतो. व त्याला त्याच्या प्रगतीत अडथळे निर्माण करतो. शरीराने निरोगी पण मानसिकतेने कमजोर असणार्‍याला मृत्यू येण्यासाठी एक नकारात्मक विचारही पुरेसा ठरतो. उलट सकारात्मक विचार शक्तीमुळे माणूस मृत्यूच्या दाढेतून परतसुद्धा येऊ शकतो. आजाराचा इलाज तर औषधाद्वारे होतच राहील पण त्याला शुभ व सकारात्मक विचारांची जोड मिळणंही आवश्यक आहे. तेव्हाच आपण लवकर बरेसुद्धा होऊ शकतो.

WD
सकारात्मक विचारांमुळे माणसाच्या जीवनात संपूर्ण परिवर्तन होऊ शकते. तो रावणाचा राम, वाल्याचा वाल्मिकी तर सैतानाचा परमेश्वरही होऊ शकतो. नकारार्थी विचारसारणीमुळे तो माणूस संकुचित होतो व तो रोगांना निमंत्रर देऊन तारतणावाला ओढवून घेतो. सकारात्मक विचारामध्ये माणसाला प्रसन्न ठेवण्याची व संपूर्ण जग बदलण्याची ताकद आहे.

आपले विचार हे बुमरँगप्रमाणे उलटून पुन्हा आपल्याकडेच येत असतात म्हणून इतरांना सोबत बोलताना वागताना विचार करूनच वागावे.

'कर भला तो हो भला' हा निसर्गाचा नियम आहे. सकारात्मक विचाराने माणूस नम्र होऊन वाद विवाद, भांडणे, सूड उगवणे या वृत्तीला लगाम लावतात त्याने त्यांची निश्चितच प्रगती होते.