शनिवार, 20 एप्रिल 2024
  1. मराठी बातम्या
  2. आज-काल
  3. मंथन
Written By
Last Modified: बुधवार, 27 एप्रिल 2016 (14:42 IST)

सर्वाधिक नास्तिकांचा देश म्हणजे नॉर्वे

जगातील सर्वात आनंदी व खूश देशांमध्ये नॉर्वेचा समावेश होतो. 'हॅप्पीनेस इंडेक्स'च्या ताज्या यादीत नॉर्वे समाधान व खुशीच्या बाबतीत चौथ्या स्थानावर आहे. यासोबतच नॉर्वेसंबंधी एक चक्रावणारी माहिती समोर आली आहे. हल्लीच करण्यात आलेल्या एका वार्षिक सर्वेक्षणातून नॉर्वेमध्ये नास्तिकतेकडे झुकणार्‍या लोकांची संख्या लक्षणीय वाढत असून हे लोक देवावर अजिबात विश्‍वास ठेवत नाहीत. या वार्षिक सर्व्हेमध्ये लोकांना देवावर श्रद्धा असण्यासंबंधी प्रश्न विचारण्यात आले असता त्यांच्यातील ४ हजार लोकांनी नकारार्थी वा माहीत नाही असे उत्तर दिले. सर्व्हेत सहभागी ३९ टक्के लोकांनी सांगितले की, ते देवावर विश्‍वास ठेवत नाही, तर २३ टक्के लोकांचे उत्तर माहीत नाही असे होते. फक्त ३७ टक्के लोकांनी ते देवावर विश्‍वास ठेवत असल्याचे सांगितले. अशा प्रकारचा पहिला सर्व्हे यापूर्वी १९८५ मध्ये करण्यात आला होता. सन १९८५च्या सर्व्हेमध्ये ५0 टक्के लोकांनी आपण देवावर विश्‍वास ठेवत असल्याचे सांगितले होते. त्यावेळी अवघ्या २0 टक्के लोकांनी नकारार्थी उत्तर दिले होते. इपसोसमधील जॉन पॉल ब्रेके मागील ३0 वर्षांपासून असा सर्व्हे करत आहे. विशेष म्हणजे ब्रिटनमध्येसुद्धा १९८३ पर्यंत अशाच सर्व्हेमध्ये देव व धर्माला न मानणार्‍यांची संख्या एकतृतीयांश होती. मात्र २0१४ मध्ये झालेल्या सर्व्हेमध्ये हा आकडा वाढून अर्ध्यावर पोहोचला.