बुधवार, 24 एप्रिल 2024
  1. वृत्त-जगत
  2. आज-काल
  3. मंथन
Written By
Last Modified: शुक्रवार, 10 एप्रिल 2015 (10:03 IST)

सर्वाधिक मायलेज देणारी दुचाकी

आता ग्राहकांच्या सेवेत लवकरच भारतातील सर्वाधिक मायलेज देणारी दुचाकी हजर होणार आहे. स्प्लेंडरच्या अभूतपूर्व यशानंतर आता हिरो मोटोकॉर्प याच दुचाकीचे अद्ययावत मॉडेल बाजारात आणत आहे. स्प्लेंडरपेक्षा आकर्षक लूकमधील ‘आयस्मार्ट’चे अँव्हरेज 105 किमी प्रतिलिटर असेल असा दावा कंपनीने केला आहे. स्पोर्टी लूक, फ्युल इफिशिअन्सी आणि आरामदायक बसण्यासाठी रचना ही हिरो मोटो कॉर्प स्प्लेंडर ‘आयस्मार्ट’ या बाइकची वैशिष्टय़े आहेत. 97.2 सीसी इंजिनक्षमता असलेल्या बाइकची एक्स शोरुम प्राइस 47,950 ते 49,150 च्या दरम्यान आहे. ही गाडी वजनाला अत्यंत हलकी आहे. या गाडीचे वजन केवळ 110 कि. ग्रॅ. आहे. डिस्क ब्रेकचा पर्याय कंपनीने दिलेला नाही. या गाडीमध्ये ळ3ड तंत्रज्ञान आहे. या तंत्रज्ञानाचा वापर गाडी हवी तेव्हा बंद किंवा सुरू करण्यासाठी होतो. गाडी पटकन बंद करुन लगेच सुरू करता येऊ शकेल अशी सुविधा कंपनीने दिली आहे.