शुक्रवार, 19 एप्रिल 2024
  1. वृत्त-जगत
  2. »
  3. आज-काल
  4. »
  5. मंथन
Written By वेबदुनिया|

सात ग्रहांच्या सौरमंडळाचा शोध

WD
ब्रिटनमधील खगोलशास्त्रज्ञ सुदूर यांनी अंतराळात सूर्याभोवती फिरणा-या सात ग्रहांचा शोध लावल्याचा दावा केला आहे. ही ग्रह प्रणाली पृथ्वीपासून १२७ प्रकाश वर्षे दूर आहे. विशेष म्हणजे आतापर्यंतच्या सर्वोत्कृष्ट ग्रहांपैकी हे ग्रह आहेत, असेही सांगण्यात आले.

द युरोपियन सदर्न ऑब्झर्वेटरी (इएसओ) च्या अभ्यासकांनी एचडी १०१८० ता-यांच्या भोवती फेरी मारणा-या पाच ग्रहांचा शोध लावला आहे. या सौरमंडळात आणखी दोन ग्रह असल्याचा दावाही त्यांनी केला आहे. त्यातील एका ग्रहावरील घनत्व अन्य ग्रहांवरील घनत्वापेक्षा कमी आहे. जर असे असेल, तर हे सर्व ग्रह आपल्या सौरमंडळाशी मिळतेजुळते असतील. नव्या सौरमंडळातील सर्व ग्रह सूर्यापासून दूर असून, ते आपल्या सौरमंडळातील ग्रहाप्रमाणेच आहेत, असा दावाही अभ्यासकांनी केला आहे. या अभ्यासकांचे नेतृत्व करणारे क्रिस्टोफर लोव्हिस यांच्या म्हणण्यानुसार सूर्याभोवती फिरणा-या आतापर्यंत शोधलेल्या ग्रहांपैकी ही सर्वोत्कृष्ट ग्रह प्रणाली आहे. याचा एक स्वतंत्र पॅटर्न असून, गेल्या सहा वर्षांपासून याचा शोध सुरू होता. एचडी १०१८० ला फेरी मारणा-या ग्रहांबरोबरच आणखी दोन ग्रह आहेत, याबद्दल आम्हाला विश्वास आहे. त्यामधील एक ग्रह आपल्या ता-यांच्या अगदी जवळ असू शकतो. या ग्रहाचे एक वर्ष पृथ्वीवरील १.१८ दिवसांबरोबर असेल, असे लोव्हिस यांनी म्हटले आहे.