शुक्रवार, 29 मार्च 2024
  1. मराठी बातम्या
  2. आज-काल
  3. मंथन
Written By
Last Modified: मंगळवार, 2 फेब्रुवारी 2016 (11:12 IST)

सावधान ! सेल्फी शेअर करणं पडू शकतं महागात

आज जागोजागी तरुण सेल्फी काढताना दिसतात. सेल्फी काढून तो सोशल मीडियावर शेअर करणे ही आजकालची फॅशनच झाली आहे. पण ही सवय तुमच्या जीवनावर परिणाम करते. असं एका संशोधनातून समोर आलंय. फेसबुक, ट्विटर आणि इंस्टाग्राम या सोशल साईटस्वर अनेक फोटो शेअर होत असतात. पण यामुळे तुमच्या प्रेमसंबंधावर परिणाम होऊ शकतो. असं एका संशोधनात समोर आलंय. 18 ते 62 वयातील 420 इंस्टाग्राम युजर्सच्या ऑनलाइन सर्वेक्षणात असं समोर आलं आहे की सेल्फी शेअर करणार्‍या व्यक्ती स्वत:ला अधिक सुंदर समजतात आणि त्यामुळे त्यांच्यात अहंकार निर्माण होतो. ज्याचा परिणाम जोडीदारावर अधिक होतो. जोडीदाराला असं वाटते की तुम्ही त्याला कमी महत्त्व देता. तुम्ही स्वत:च्या सेल्फी काढण्यात आणि पोस्ट करण्यात वेळ देता पण तुम्ही त्याला वेळ देऊ शकत नाही.