मंगळवार, 23 एप्रिल 2024
  1. वृत्त-जगत
  2. आज-काल
  3. मंथन
Written By wd|
Last Modified: सोलापूर , बुधवार, 29 ऑक्टोबर 2014 (11:43 IST)

सोलापुरात 20 नोव्हेंबरपासून मराठी ख्रिस्ती साहित्य संमेलन

मराठी ख्रिस्ती रौप्महोत्सवी साहित्य संमेलन 20 ते 22 नोव्हेंबर या कालावधीत शिवछत्रपती रंगभवन येथे आयोजित करण्यात आले आहे. या संमेलनाच्या अध्यक्षपदी वसईचे प्रा. डॉ. नाझरथ मिस्किटा यांची निवड करण्यात आली असून संमेलनास प्रमुख पाहुणे म्हणून माजी केंद्री गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे हे उपस्थित राहणार आहेत.
 
सोलापुरात होणार्‍या या संमेलनाच्या पूर्वतयारीचा आढावा संमेलनाचे नूतन अध्यक्ष डॉ. मिस्किटा यांनी रविवारी घेतला. सोलापूरकरांसाठी हे संमेलन संस्मरणी ठरेल अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली. याप्रसंगी परिषदेचे विद्यमान अध्यक्ष अशोक आंग्रे यांनी परिषदेच्या कार्याचा आढावा घेतला. 
 
या संमेलनाचे स्वागताध्यक्ष मोहन आंग्रे यांनी संमेलनाच्या पूर्वतयारीची माहिती दिली. या संमेलनास प्रमुख पाहुणे म्हणून माजी केंद्रीय  गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे हे उपस्थित राहणार असून शहरातील मान्यवर साहित्यिक आमदार-खासदार, कार्यकर्ते यांनाही या संमेलनासाठी आमंत्रित करण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले.
 
यावेळी पालिकेचे सेवानिवृत्त सहायक आयुक्त अनिल विपत, वनिता मेकँझी, सुनील जाधव, प्राचर रुपश्री येवलेकर, शोभा पाडाळे आदी उपस्थित होते. परिषदेच्या पदाधिकार्‍यांनी संमेलनस्थळाची माहिती घेतली.
 
या संमेलनास राज्यातील जालना, औरंगाबाद, वसई, ठाणे, नाशिक, पुणे, मुंबई आदी भागातील प्रतिनिधी उपस्थित राहणार आहेत. सेंट जोसेफ प्रशालेपासून ग्रंथ दिंडी काढण्यात येणार असून लेझीम, बँड आदी पथकांचाही यामध्ये समावेश राहणार आहे.