शनिवार, 20 एप्रिल 2024
  1. मराठी बातम्या
  2. आज-काल
  3. मंथन
Written By
Last Modified: शुक्रवार, 30 ऑक्टोबर 2015 (14:23 IST)

‘एरोपोनिक व हायड्रोपोनिक तंत्रज्ञानामुळे दुष्काळावर मात करणे शक्य’

अमेरिकेतील वायोमिंग स्टेटचे गव्हर्नर मॅट मेड 
इंडो- वायोमिंग (अमेरिका) व्यावसाय व सांस्कृतिक केंद्राचे वायोमिंग राज्याचे गव्हर्नर श्री. मॅट मेड यांच्या हस्ते उद्घाटन
श्री. भावूक त्रिपाठी यांच्या पुढाकाराने पहिल्या इंडो- वायोमिंग व्यवसाय व सांस्कृतिक केंद्राची पुण्यात स्थापना
या केंद्राच्या माध्यमातून पुणे व वायोमिंगसाठी  शैक्षणिक, व्यावसायिक व सांस्कृतिक संधी नव्याने उपलब्ध होणार.    
पहिल्या भारत – वायोमिंग व्यावसाय व संस्कृती केंद्राची स्थापना कोरेगाव पार्क येथे करण्यात आली आहे. याचे उद्घाटन २४ ऑक्टोबर रोजी अमेरिकेतील वायोमिंग राज्याचे गव्हर्नर महामहीम श्री. मॅट मेड यांच्या हस्ते करण्यात आले. उद्घाटन समारोहासाठी भावूक त्रिपाठी, भारतीय जनता पक्षाचे आमदार श्रीकांत जोशी व डॉ. शेशाद्री चारी व्यासपीठावर उपस्थित होते. पुण्यात झालेल्या आदरातिथ्याने गव्हर्नर श्री. मॅट मेड प्रभावित झाले. 
 
भारत  व अमेरिका या दोन देशांमधील असणाऱ्या विविध कला, तंत्रज्ञान, व्यवसाय, पर्यटन यांना अधिक वाव मिळवून देण्यासाठी श्री. भावूक त्रिपाठी  व त्यांच्याशी संलग्न असलेल्या इतर संस्था व द वायोमिंग स्टेट आणि विद्यापीठ यांच्या संयुक्त विद्यमाने इंडो-वायोमिंग व्यावसाय व सांस्कृतिक केंद्राची भारतात चार ठिकाणी स्थापना करण्यात येणार असून त्यापैकी पहिल्या केंद्राची स्थापना पुण्यातील कोरेगाव पार्क येथे करण्यात आली आहे. वायोमिंग राज्याचे गव्हर्नर श्री. मॅट मेड हे  पुण्यात येणे ही एक मानाची बाब आहे. 
 
पुणे शहर महाराष्ट्राची शैक्षणिक व सांस्कृतिक राजधानी आहे. दर वर्षी पुण्यातील लाखो तरुण अमेरिकेत उच्च शिक्षणासाठी जाण्यास उत्सुक असतात. इंडो-वायोमिंग व्यवसाय व सांस्कृतिक केंद्र त्यांना अमेरिकेतील व प्रामुख्याने वायोमिंग राज्यातील उच्च  शिक्षणाच्या संधी संदर्भात मार्गदर्शन करू शकेल. त्यामुळे विद्यार्थ्यांच्या दृष्टीने हे केंद्र महत्वाचे ठरेल.  
 
वायोमिंग स्टेटचे गव्हर्नर श्री. मॅट मेट म्हणाले की, वायोमिंग स्टेट भौगोलिकदृष्ट्या मोठे असले तरी त्याची लोकसंख्या कमी आहे, तरी भारतातील व्यावासयांना खास करुन शेती, उर्जा क्षेत्र, भौतिक विज्ञान या क्षेतात वायोमिंग मोठ्या प्रमाणात संधी उपलब्ध होवू शकतात. ते पुढे म्हणाले की, केंद्रामार्फत एरोपोनिक व हायड्रोपोनिक या तंत्रज्ञानाचा प्रचार व प्रसार करण्यात येईल. व त्याचा महाराष्ट्रातील शेतकऱ्याना व त्याच प्रमाणे ज्या शहरांमध्ये केद्राची स्थापना करण्यात येणार आहे, तेथील शेतकऱ्याना मोठ्या प्रमाणात फायदा होईल.   
 
ब्रह्म कोर्पोरेशनचे मुख्य कार्यकारी अधिकारी व भारत – वायोमिंग व्यावसाय व संस्कृती केंद्रासाठी पुढाकार घेणारे श्री. भावूक त्रिपाठी म्हणाले की, कमी पाण्यावरील शेतीवर वायोमिंग विद्यापीठामध्ये मोठ्याप्रमाणात संशोधन केले असून या तंत्रज्ञानाचा भारतात वापर जास्त फायदेशीर ठरणार आहे.  
 
भारतीय जनता पक्षाचे माजी आमदार श्री. श्रीकांत जोशी म्हणाले की, वायोमिंग स्टेट विद्यापीठानी केलेल्या संशोधनाचा मराठवाड्याला व अन्य भागांना मोठ्या प्रमाणावर उपयोग होऊ शकतो. अशा पद्धतीचे केंद्र मराठवाड्यात उभे करावे यासाठी इंडो – वायोमिंग केंद्रामार्फत प्रयत्न करण्यात येतील.  
 
अमेरिकेतील वायोमिंग स्टेट बाबत थोडेसे...  
भारत आरोग्यसेवा, पर्यावरण, उर्जा व रक्षा या क्षेत्रात आशिया खंडातील दुसऱ्या क्रमांकाची बाजारपेठ आहे. भारतातील गुंतवणूक अमेरिकन कंपन्यासाठी व वायोमिंग मधील गुंतवणूक भारतीय कंपन्यांसाठी उपयुक्त ठरेल, त्यामुळेच या इंडो-वायोमिंग व्यावसाय केद्राचा या दोन्ही देशांना फायदा होईल. वायोमिंग राज्य व भारत हे एकमेकांना व्यावसायिक क्षेत्रात उपयुक्त ठरू शकतात. वायोमिंगमध्ये नैसर्गिक संसाधने, तेल, नैसर्गिक वायू व खनिजे मोठ्या प्रमाणात उपलब्ध आहेत. वायोमिंग राज्यात सापडणारा कोळसा अमेरिकेच्या अर्थव्यवस्थेत महत्वाची भूमिका बजावतो. सन २००९ साली वायोमिंग राज्याच्या खनिज क्षेत्राने अमेरिकन सरकारला कर रुपात १.८ बिलियन डॉलर्स  दिले आहेत. २३ हजारापेक्षा जास्त रोजगाराच्या संधी वायोमिंग राज्यात आरोग्यसेवेशी निगडीत आहे. भारत वायोमिंगमधील माहिती व तंत्रज्ञान क्षेत्रासाठी कुशल मनुष्यबळ पुरवू शकतो. वायोमिंग हे अमेरिकेतील राज्य पर्यटनासाठी प्रसिद्ध आहे. अमेरिकेत असणारे भारतीय व भारतातून अमेरिकेत जाणाऱ्या पर्यटकांसाठी वायोमिंग राज्य रम्य आहे. येथील जॉर्ज वॉशिगटन मेमोरिअल पार्क, वायोमिंग फ्रंटीयर प्रीझन, यलोस्टोन नॅशनल पार्क ही काही प्रमुख पर्यटन स्थळे आहेत. वायोमिंग राज्य मोठ्या पर्वतरांगा व मैदाने यांसाठी प्रसिद्ध आहे. 
 
एरोपोनिक व हायड्रोपोनिक तंत्रज्ञानाबाबत : 
एरोपोनिक तंत्रज्ञानाच्या माध्यमातून कमीत कमी पाण्याचा वापर व मातीचा वापर न करता विविध पद्धतीची रोपे वाढवता येवू शकतात. या पद्धतीचा वापर करून उभ्या किंवा आडव्या पद्धतीने करता येवू शकतात. जागा वाचविण्यासाठी ही पद्धत अतिशय फायदेशीर आहे. हायड्रोपोनिक : पोषकद्रव्ये आणि पाणी यांचा वापर करून मातीच्या वापराशिवाय रोपटे वाढविण्याची ही पद्धत आहे. यात पाण्याचा पुरवठा थेट रोपट्याच्या मुळाशी केला जातो.