testwebdunia1
testwebdunia0
testwebdunia2
Widgets Magazine
Widgets Magazine

नोकर्‍यांचाही दुष्काळ!

स्टेट बँकेतील दीड हजार पदांसाठी 17 लाख अर्ज

job
मुंबई | वेबदुनिया|
WD
पाण्यासोबतच देशात नोकर्‍यांचाही मोठा दुष्काळ असल्याचे विदारक चित्र स्टेट बँक ऑफ इंडियाच्या कर्मचारी भरतीच्या माध्यमातून समोर आले आहे.

एसबीआयने क्लार्कची दीड हजार पदे भरण्यासाठी जॉब्स फॉर लाईफ या शीर्षकाखाली जाहीरात दिली होती. या अर्जाला प्रतिसाद म्हणून तब्बल सतरा लाख जणांनी या पदांसाठी अर्ज केले. आता या सतरा लाखांतून अंतिम दीड हजार जणांची निवड करणे बँकेसाठी आव्हान बनले आहे. गेल्या 18 महिन्यांपासून खासगी क्षेत्रातील नोकर्‍या आटत चालल्या असून एसबीआयची ही नोकरभरती तरुणांना वाळवंटात पाण्याचा झरा सापडल्यागत वाटत असल्यानेच या भरतीसाठी मोठ्या प्रमाणात अर्ज आल्याचे दिसते.


यावर अधिक वाचा :