testwebdunia1
testwebdunia0
testwebdunia2
Widgets Magazine
Widgets Magazine

संधी रोजगाराची खात्री नोकरीची

Last Modified शुक्रवार, 8 मे 2015 (14:11 IST)
उज्ज्वल भवितव्यासाठी भरारी घेताना पंखांत बळ हवे प्रयत्नांचे. या प्रयत्नांना दिशा मिळेल आता एका क्लिकवर.

मुख्यमंत्री इंटर्नशीप कार्यक्रम 2015
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी युवकांना प्रशासनात सहभागी करुन घेण्याच्या उद्देशाने ‘मुख्यमंत्री इंटर्नशीप कार्यक्रम 2015’ ची घोषणा केलेली आहे. कार्यक्रमात सहभागी होणाऱ्या युवकांना त्याच्या विकासासाठी आवश्यक अनुभव व कौशल्ये या कार्यक्रमाच्या माध्यमातून प्राप्त होतील. दिनांक 1 एप्रिल 2015 रोजी 25 वर्षापेक्षा कमी वय असणारे, कोणत्याही शाखेचे शाखेचे पदवीधर यासाठी अर्ज करु शकतील. कार्यक्रमाचा कालावधी 11 महिने व दरमहा विद्यावेतन 20,000 असेल. नामांकित संस्था, उद्योग या सार्वजनिक उपक्रम संस्थेतील किमान एक वर्षा अनुभव आवश्यक राहील. आयआयटी, आयआयएम, शासकीय आभियंत्रिकी महाविद्यालये, एनआयटी, आयआयएम, व्हीजेटीआय, व्हीएनआयटी या सारख्या नामांकित शिक्षण संस्थातील विद्यार्थ्यांसाठी अनुभवाची अट शिथिल केली जाईल. कार्यक्रमाचा अधिक तपशील जाणून घेण्यासाठी व उद्देशाने मुख्यमंत्री इंटर्नशीप कार्यक्रम 2015 साठी अर्ज करण्यासाठी http://oasis.mkcl.org/gomcmip2015 या संकेतस्थळास भेट देऊन 15 मे 2015, सायंकाळी 8 पूर्वी ऑनलाईन अर्ज करा. मदतीसाठी दूरध्वनी क्र: 9326552525

नागपूर महानगरपालिका येथे राष्ट्रीय शहरी आरोग्य आभियान अंतर्गत विविध पदाच्या 304 जागा
नागपूर महानगरपालिका येथे राष्ट्रीय शहरी आरोग्य आभियान (एन.यु.एच.एम) अंतर्गत कंत्राटी पद्धतीने स्टाफ नर्स (77 जागा), ए.एन.एम (93 जागा), लॅब टेक्निशियन (29 जागा), फार्मसिस्ट (29 जागा), डाटा एन्ट्री ऑपरेटर कम अकाऊंटंट (13 जागा), अटेंडंट (27 जागा), वैद्यकीय अधिकारी (17 जागा), स्त्री रोग तज्ज्ञ (7 जागा), बाल रोग तज्ज्ञ (7 जागा), औषधी तज्ज्ञ (3 जागा), भूल तज्ज्ञ (2 जागा) यापदांसाठी ऑनलाईन अर्ज मागविण्यात येत आहेत. अर्ज करण्याची अंतिम तारीख 15 मे 2015 आहे. अधिक माहिती www.nmcnagpur.gov.in या संकेतस्थळावर उपलब्ध आहे.

महिला व बाल विकास आयुक्तालय, पुणे येथे विविध पदाच्या 52 जागा
महिला व बाल विकास आयुक्तालय, पुणे येथे सुरक्षण अधिकारी (9 जागा), विधी सल्लागार (9 जागा), समुपदेशक (10 जागा), कृषी सहाय्यक (3 जागा), शिक्षक (21 जागा) या पदासाठी ऑनलाईन अर्ज मागविण्यात येत आहेत. अर्ज करण्याची अंतिम तारीख 19 मे 2015 आहे. अधिक माहिती http://www.wcdexam.in या संकेतस्थळावर उपलब्ध आहे.

राष्ट्रीय इन्शुरन्स अकॅडमी पुणे येथे विविध पदाच्या 5 जागा
राष्ट्रीय इन्शुरन्स अकॅडमी, पुणे येथे विविध विभागात अकॅडमिक असिसटंन्स (ग्रेड -1)-(4 जागा), अकॅडमिक अटेन्डन्स (स्थापत्य) (1 जागा) या पदासाठी विहित नमुन्यात अर्ज मागविण्यात येत आहेत. अर्ज करण्याची अंतिम तारीख 15 मे 2015 आहे. अधिक माहिती www.niapune.com या संकेतस्थळावर उपलब्ध आहे.

राष्ट्रीय कोशिका विज्ञान केंन्द्र पुणे येथे विविध पदांची भरती
राष्ट्रीय कोशिका विज्ञान केंद्र पुणे येथे ऑफिसर 'डी' (ॲडमिनीस्ट्रेशन) (1 जागा), ऑफिसर 'बी' (ॲडमिनीस्ट्रेशन) (1 जागा), ऑफिसर 'ए' (1 जागा) या पदासाठी पात्र उमेदवारांन कडून अर्ज मागविण्यात येत आहेत. अर्ज करण्याची अंतिम तारीख 15 मे 2015 आहे. ही भरती सरळ सेवेतून अथवा प्रतिनिधी (डेप्युटेशनवर ) म्हणून करण्यात येणार आहे. अधिक माहिती http://www.nccs.res.in या संकेतस्थळवर उपल्पब्ध आहे.
जिल्हा परिषद, जालना येथे विविध पदाच्या 73 जागा
जिल्हा परिषद, जालना येथे कृषि अधिकारी (1 जागा), पर्यवेक्षिका (6 जागा), औषध निर्माण अधिकारी (4 जागा), वरिष्ठ सहाय्यक लेखा (1 जागा), आरोग्य सेवक (पुरुष) हंगामी (26 जागा), आरोग्य सेवक (महिला) (12 जागा), ग्रामसेवक (कंत्राटी) (13 जागा), आरोग्य पर्यवेक्षक (1 जागा), विस्तार अधिकारी (पं) (1 जागा), वरिष्ठ सहाय्यक (लिपीक) (2 जागा), कनिष्ठ सहाय्यक (5 जागा), विस्तार अधिकारी (सां) (5 जागा) या पदाकरिता ऑनलाईन अर्ज मागविण्यात येत आहेत. अर्ज करण्याची अंतिम तारीख विविध पदानुसार 27, 30 एप्रिल व 5 आणि 10 मे 2015 आहे. अधिक माहिती http://www.jalna.nic.in या संकेतस्थळावर उपलब्ध आहे.

महाराष्ट्र लोकसेवा आयोगातर्फे कर सहायक पदांच्या 598 जागा
महाराष्ट्र लोकसेवा आयोगातर्फे गट - क संवर्गातील कर सहायक (598 जागा) या पदासाठी ऑनलाईन अर्ज मागविण्यात येत आहेत. अर्ज करण्याची अंतिम तारीख 12 मे 2015 आहे. अधिक माहिती www.mpsc.gov.in या संकेतस्थळावर उपलब्ध आहे.

डॉ.पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ, अकोला येथे विविध पदाच्या 37 जागा
डॉ.पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ, अकोला येथे विविध पदाच्या 37 जागासाठी पात्र उमेदवारांकडून विहित नमुन्यात अर्ज मागविण्यात येत आहेत. अर्ज करण्याची अंतिम तारीख 15 मे 2015 आहे. अधिक माहिती www.pdkv.ac.in या संकेतस्थळावर उपलब्ध आहे.

मिरा भाईंदर महानगरपालिका येथे लघुटंकलेखन पदाच्या 4 जागा
मिरा भाईंदर महानगरपालिका येथे कंत्राटी पद्धतीने लघुटंकलेखन (मराठी) (4 जागा) या पदासाठी थेट मुलाखतीचे आयोजन करण्यात आले आहे. या मुलाखती दिनांक 13 मे 2015 रोजी घेण्यात येणार आहेत. यासंबंधीची जाहिरात 17 एप्रिल 2015 रोजीच्या लोकमत या वृत्तपत्रात प्रसिद्ध झाली आहे. अधिक माहिती www.mbmc.gov.in या संकेतस्थळावर उपलब्ध आहे.

माझगांव डॉक लिमिटेड, मुंबई येथे उप महाव्यवस्थापक पदाच्या 3 जागा
माझगांव डॉक लिमिटेड, मुंबई येथे उप महाव्यवस्थापक (3 जागा) या पदासाठी ऑनलाईन अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज करण्याची अंतिम तारीख 14 मे 2015 आहे. यासंबंधीची जाहिरात 16 एप्रिल 2015 रोजीच्या लोकसत्ता या वृत्तपत्रात प्रसिद्ध झाली आहे. अधिक माहिती www.mazagondock.gov या संकेतस्थळावर उपलब्ध आहे.

शासकीय वैद्यकीय महाविद्यालयामधील विविध विषयांच्या प्राध्यापक पदाच्या 117 जागा
वैद्यकीय शिक्षण व औषध द्रव्ये विभाग अंतर्गत वैद्यकीय शिक्षण व औषध द्रव्ये विभागाच्या अधिनस्त शासकीय वैद्यकीय महाविद्यालयामधील विविध विषयांचे प्राध्यापक (35 जागा), सहयोगी प्राध्यापक (82 जागा) या पदासाठी ऑनलाईन अर्ज मागविण्यात येत आहेत. पात्र उमेदवारांनी दि 8 मे ते 28 मे 2015 या कालावधीत अर्ज करावे. यासंबंधीची जाहिरात 9 एप्रिल 2015 रोजीच्या लोकमत या वृत्तपत्रात प्रसिद्ध झाली आहे. अधिक माहिती www.mahaonline.gov या संकेतस्थळावर उपलब्ध आहे.

न्यूक्लिअर पॉवर कॉर्पोरेशन ऑफ इंडिया लिमिटेड मध्ये विविध पदाच्या 128 जागा
न्यूक्लिअर पॉवर कॉर्पोरेशन ऑफ इंडिया लिमिटेड मध्ये विविध पदाच्या 128 जागांसाठी ऑनलाईन अर्ज मागविण्यात येत आहेत. अर्ज करण्याची अंतिम तारीख 31 मे 2015 आहे. यासंबंधीची जाहिरात 2 एप्रिल 2015 रोजीच्या लोकसत्ता या वृत्तपत्रात प्रसिद्ध झाली आहे. अधिक माहिती www.npcilcareers.co.in या संकेतस्थळावर उपलब्ध आहे.

‘नोकरी शोधा’ या सदरात देण्यात येणारी रिक्त पदांची माहिती संबंधित विभागाने वृत्तपत्रात अथवा त्यांच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध केल्याप्रमाणे असते. उमेदवारांच्या सोयीसाठी ‘महान्यूज’ मध्ये ती संकलित केली आहे. सविस्तर माहितीसाठी उमेदवारांनी मूळ जाहिरात पाहावी.

साभार : महान्यूज


यावर अधिक वाचा :