testwebdunia1
testwebdunia0
testwebdunia2
Widgets Magazine
Widgets Magazine

सरकारी नोकरी

job
वेबदुनिया|
WD
कॉर्पोरेट जगतात दिमाखाने वावरून लाखो रुपये कमावण्याकडे हल्लीच्या पिढीचा ओढा दिसते. पण नुकत्याच जाहीर झालेल्या सहाव्या वेतन आयोगामुळे आजच्या तरुणांचा हा दृष्टिकोन बदलला आहे. खाजगी क्षेत्राप्रमाणे सरकारी नोकरीतही भरपूर पगार मिळू लागले आहेत. सरकारी नौकरी म्हणजे सेक्यु‍रीटीही आलीच, चांगला पगार, मिळवलेल्या ज्ञानाचा पुरेपूर वापर करण्याची संधी आणि लोकांकडून मिळणारा मान सरकारी नोकरीत मिळतो.

शासनाकडे ज्या ज्या खात्यांमध्ये रिक्त जागा आहेत, त्यासंबंधी माहिती उपलब्‍ध करून देणार्‍या काही वेबसाईट असतात. सरुक्षिततेची नोकरी म्हणून शासकीय नोकरीकडे पाहिले जाते. केंद्र व राज्य शासनाकडे कोणकोणत्या नोकर्‍या मिळू शकतात या संबंधी रोजगार मंत्रालयाने प्रसिद्धीस दिलेली पत्रकेही पाहता येतील.

10 वी 12 वी नंतर विद्यार्थी फायरमन, ज्युनिअर क्लार्क, सफाई वाला, इलेक्ट्रिशियन अशा भरपूर पदांवर रुजू होऊ शकतो. 10वी पास झालेल्याला बहुत करून प्रत्येक सरकारी विभागमध्ये लोवर डिविजन क्लार्कची पदे असतात. तसेच पोस्ट ऑफिस, इंडियन आर्मी या सरकारी ऑफिसमध्ये सुद्धा भरपूर पदे असतात. पदवीधर विद्यार्थी राज्य सेवा परीक्षा किंवा संघ लोक सेवा आयोग सारख्या परीक्षा देऊन उच्च पदावर कार्यरत होऊ शकतो.


यावर अधिक वाचा :