शुक्रवार, 29 मार्च 2024
  1. लाईफस्टाईल
  2. करिअर
  3. नोकरीच्या संधी
Written By
Last Modified: बुधवार, 14 जुलै 2021 (21:11 IST)

आयकर विभागात खेळाडूंसाठी भरती

केंद्र शासनाच्या आयकर विभागात राष्ट्रीय तसेच आंतरराष्ट्रीय स्तरावर सहभागी तसेच प्राविण्यधारक खेळाडूंकरिता (Players) विविध पदांच्या भरतीचा कार्यक्रम जाहिर झालेला आहे. या जाहिरातीत जे पात्र खेळ प्रकार नमुद केलेले आहे त्या खेळ प्रकारामध्ये भारतीय शालेय खेळ महासंघाने आयोजित केलेल्या शालेय राष्ट्रिय क्रीडा स्पर्धेत महाराष्ट्र राज्याचे प्रतिनिधीत्व केलेले खेळाडू पात्र ठरणार आहेत.
 
संबंधित खेळाडूंची राष्ट्रीय स्पर्धेतील कामगिरी क्रीडा व युवक सेवा संचालनालय, महाराष्ट्र राज्य, पुणे येथून प्रमाणित करुन घेणे आवश्यक आहे. मात्र राज्यातील कोवीड-19 विषाणूच्या प्रादुर्भावाचा विचार करता राष्ट्रिय स्तरावरील कामगिरी प्रमाणित करून घेण्याकरीता राज्यातील खेळाडूंनी पुणे येथे व्यक्तीश: उपस्थित राहणे धोक्याचे ठरु शकते. यास्तव जळगाव जिल्ह्यातील आयकर विभागाच्या भरतीसाठी इच्छुक असणाऱ्या पात्र खेळाडूंचे अर्ज जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय, जळगाव येथे स्वीकारून प्रमाणित करण्यासाठी क्रीडा व युवक सेवा संचालनालय, महाराष्ट्र राज्य, पुणे येथे 20 ऑगस्ट, 2021 पुर्वी पाठविण्यात येणार आहेत.
 
पात्र खेळाडूंची कामगिरी प्रमाणित करणारे विहित नमुन्यातील फॉर्म-4 खेळाडूंना त्यांच्या ईमेलव्दारा पुणे कार्यालयामार्फत पाठविण्यात येणार असुन त्याची मुळ प्रत त्यांच्या निवासी पत्यावर पोस्टाव्दारे पाठविण्यात येईल. खेळाडूंनी स्वत:ची माहिती दिलेल्या नमुन्यात जिल्हा क्रीडा अधिकारी, जळगाव यांचे नावाने विनंती अर्ज व प्रमाणपत्राच्या सत्यप्रतीसह 17 ऑगस्ट, 2021 पूर्वी सादर करावे. असे जिल्हा क्रीडा अधिकारी मिलिंद दिक्षित यांनी कळविले आहे.