शुक्रवार, 19 एप्रिल 2024
  1. लाईफस्टाईल
  2. करिअर
  3. नोकरीच्या संधी
Written By
Last Updated : बुधवार, 1 फेब्रुवारी 2017 (16:06 IST)

संधी योग क्षेत्रातील....

योग प्रशिक्षक बनण्यासाठी फक्त योगासनांचं ज्ञान पुरेसं ठरत नाही तर योगावर निष्ठा असणं गरजेचं आहे. योग प्रशिक्षकानं सतत योगसाधना करत रहायला हवी. 
 
* योग प्रशिक्षक बनण्यासाठी योगाचं व्यावसायिक प्रशिक्षण घेणं गरजेचं आहे. योगविषयक पदवी, पदविका आणि प्रमाणपत्र अभ्यासक्रम अनेक संस्थांमध्ये उपलब्ध आहे. 
* योगाचं प्रशिक्षण घेतल्यानंतर शाळा, हेल्थ सेंटर, पंचतारांकित हॉटेल्स, जीम, हेल्थ क्लब, स्पा, रिसॉर्टस अशा ठिकाणी रोजगाराच्या संधी उपलब्द होतात. 
* पुरेशा अनुभवानंतर स्वत:चं योग केंद्र सुरू करता येईल. योग प्रशिक्षक म्हणूज शासकीय संस्थांमध्ये संधी मिळू शकते. 
* परदेशामध्ये योगाचा प्रसार होत असल्यानं तेथेही चांगल्या संधी मिळतात. 
* भारतीय विद्या भवन, दिल्ली इंडियन इन्स्टीट्यूट ऑफ योगिक सायन्स अँड रिसर्च, मोरारजी देसाई नॅशनल इन्स्टीट्यूट ऑफ योग, अय्यंगार योग सेंटर पुणे, देवसंस्कृती विद्यापीठ हरिद्वार, पतंजली विद्यापीठ, उत्तराखंड यासारख्या संस्थांमध्ये योगाचं प्रशिक्षण दिलं जातं.