शनिवार, 20 एप्रिल 2024
  1. लाईफस्टाईल
  2. »
  3. करिअर
  4. »
  5. नोकरीच्या संधी
Written By वेबदुनिया|

सव्वालाख बेरोजगारांना मिळणार रेल्वेत नोकर्‍या!

WD
सध्या मंदीतून जाणार्‍या भारतीय रेल्वेने देशातील बेरोजगारी कमी करण्याच्या प्रयत्नात चालू वर्षी 1 लाख 17 हजार युवकांना रोजगार उपलब्ध करून देण्याची तयारी दर्शविली आहे.

देशातील सर्वात मोठी एम्लॉयर असलेली रेल्वे चालू वर्षात 'सी' आणि 'डी' दर्जाच्या पदांवर सुमारे 1 लाख 17 हजार युवकांची भारती करणार आहे. यात स्टेशन मास्तरपासून टेक्निकल स्टाफ, ट्रॅक सुपरवायझर, रेल्वे चालक आणि सुरक्षारक्षक यांचा समावेश आहे.

या कॅटेगिरीच्या पदावर मागील दोन वर्षांपासून जवळपास 95,000 पदांची भरती झालेली आहे. भविष्यात रिक्त होणार्‍या जागा विचारात घेता ही भरती प्रक्रिया सुरू झालेली आहे. रेल्वेत प्रत्येक वर्षी जवळपास 40,000 कर्मचारी रिटायर्ड होत असतात. रेल्वे भरतीच्या अभियानाला 2008मध्ये जोरदार झटका बसला होता.

ऑक्टोबर 2008मध्ये रेल्वेची परीक्षा देण्यास राज्याबाहेरून आलेल्या परिक्षार्थींना मुंबई रेल्वेस्थानकावरच महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या कार्यकार्त्यांनी मारहाण केली होती. काही महिन्यानंतर अलाहाबाद आणि अजमेर बोर्डात रेल्वेच्या परीक्षेत प्रश्नपत्रिका फुटल्या होत्या. हा प्रकार मुंबईतही झालेला होता.

2008, 2009 आणि 2010 मध्ये अनेक राज्यांत विधानसभा निवडणुका झाल्या. 2009मध्ये रेल्वेने भरती प्रक्रियेत मोठा केलेला आहे. 2009 आणि 2010च्या उशिराची भरपाई म्हणून मागील दोन वर्षात मोठ्या प्रमाणावर भरती करण्यात आलेली आहे.

2011-12मध्ये सी ग्रेडच्या जवळपास 23,000 बेरोजगारांची भरती झालेली होती. या वर्षी ही संख्या 32,000 वर पोहोचण्याची आशा आहे.

या आकडेवारीच्या तुलनेत पहिल्या वर्षात 'सी'च्या पदाची आधीच भरती झालेली होती. 2011-12 मध्ये ग्रेड 'सी' जागासाठी फक्त एक परीक्षा झालेली होती तर चालू वर्षात 10 परीक्षा झालेल्या आहेत. ग्रेड 'डी'च्या पदासाठी जवळपास 85,000 लोकांची भरती करण्यात येणार आहे.