testwebdunia1
testwebdunia0
testwebdunia2

ब्युटी पार्लर तुमच्याच स्वयंपाकघरात

वेबदुनिया|
आपल्या सुंदर नाजूक चेहर्‍याबाबत काही समस्या उद्‍भवल्यास आपण सरळ सौंदर्यतज्ज्ञाचा सल्ला घेण्यासाठी जातो. मात्र, आपण हे विसरतो, की आपल्याच घरातील स्वयंपाक खोलीत सौंदर्यवर्धक वस्तुंचा खजिना आहे. या खोलीत एक नजर फिरवली तर एक ना अनेक बहुगुणी गोष्टी तुमच्या दृष्टीस पडतील. त्या वस्तूंचे लेप तयार करून त्याचा उपयोग फेस पॅक म्हणून करू शकता.
घरगुती वस्तुंपासून फेस पॅक तयार करण्याच्या पध्दती-

चंदन- चंदन उगाळून त्यात गुलाब पाण्याचे काही थेंब टाकून तयार केलेला लेप चेहर्‍यावर लावल्याने त्वचेला थंडावा मिळतो. चेहर्‍याची त्वचा अधिक गुळगुळीत असेल तर चंदनात काही प्रमाणात गंधक मिसळावे. उन्हाळ्याच्या दिवसांमध्ये हा फेस पॅक चेहर्‍यासाठी अधिक गुणकारी असतो.

दही - एक चमचा हरभरा डाळीच्या पीठात दोन चमचे दही, दोन थेंब मध यांचे मिश्रण तयार करून अर्धा तास तसेच राहू द्या. सुरकत्या पडलेल्या चेहर्‍यावर लावल्याने आराम पडतो.

पुदिना - हिरवा पुदिना वाटून साधारण अर्धा तास चेहर्‍यावर लावून ठेवा. त्यानंतर थंड पाण्याने चेहरा धुऊन घ्या. पुदिन्याचा लेप लावल्याने त्वचेची उष्णता हळू हळू कमी होते व तारूण्यपिटीकांचे डागदेखील कमी होतात.

सोयाबीन किंवा मसूर डाळ :- एक छोटी वाटी सोयाबीन किंवा मसूर डाळ रात्री पाण्यात भिजवून ठेवा. सकाळी त्यातील पाणी काढून ते चांगल्या पध्दतीने वाटून घ्या. त्यात थोडे कच्चे दूध व बदाम पावडर टाकून लेप तयार करा व तो चेहर्‍यावर लावल्याने त्वचेमधील कोरडेपणा दूर होतो.

उडीद डाळ- उडीद डाळीची पावडर तयार करून त्यात गुलाब जल, ग्लिसरीन व बदाम पावडर मिसळा व तयार झालेला लेप लावल्याने चेहरा प्रसन्न होतो व सुरकुत्या नाहीशा होतात.

लोणी - पाण्यात थोडे लोणी मिसळून तयार झालेला लेप अर्धा तास चेहर्‍यावर लावून ठेवल्यानंतर कोमट पाण्याने चेहरा धुऊन घ्या. चेहर्‍यावर लोणी लेप लावल्याने त्वचेचा शुष्कपणा नाहीसा होतो.

काकडी - काकडी मिक्सरमध्ये बारीक करून घ्या. त्यात थोडे दूध टाकून तयार झालेला लेप चेहरा व मानेवर लावा. काही वेळ तसाच ठेवून धूवून टाका. त्याने चेहर्‍यावरील कोरडेपणा दूर होऊन त्वचा मुलायम होते.

मुलतानी माती - एक छोटा चमचा मुलतानी माती घ्या. त्यात एक छोटा चमचा गुलाब पाणी अथवा क्लीनजिंग मिल्क मिसळून त्याचा लेप चेहर्‍यावर लावा. 10 ते 15 मिनिटानंतर कोमट पाण्याते ते धूवून टाका. त्याने चेहरा तेजस्वी दिसतो.


यावर अधिक वाचा :

ICC चे हे 7 नियम वर्ल्डकप स्पर्धेत पहिल्यांदाच लागू होतील

national news
क्रिकेट वर्ल्ड कपचा 12वा संस्करण ग्लंड-वेल्समध्ये 30 मे पासून सुरू होईल. यावेळी फक्त 10 ...

ज्या गुरुजीने लग्न लावून दिले, त्यासोबत 15 दिवसाने पळाली ...

national news
ऐकायला फिल्मी आणि विचित्र वाटेल पण ज्या गुरुजीने लग्न लावून दिले, नवरी त्यासोबत पळून ...

Whatsapp वर येणार आहे हा खास फीचर, करेल वेळेची बचत

national news
सोशल मीडिया वापरकर्त्यांसाठी एक चांगली बातमी आहे. व्हाट्सएप एक नवीन फीचर आणत आहे ज्याच्या ...

लठ्ठ असल्यामुळे सासरच्यांकडून छळ, विवाहितेची आत्महत्या

national news
ती शरीराने जरा जाड होती पण जाड असणे गुन्हा तर नाही. पण सतत कोणाला याची जाणीव करुन देणे ...

ड्यूल स्क्रीन लॅपटॉप, जाणून घ्या फिचर्स

national news
कॉम्पुटेक्ट 2019 कॉन्फरन्समध्ये Asus ने ड्यूल स्क्रीन असणारा लॅपटॉप लाँच केला आहे. ...

योग करण्यापूर्वी माहीत असावे हे 7 नियम नाही तर होऊ शकतं ...

national news
शरीराची तयारी व्यायामापूर्वी ज्या प्रकारे वार्मअप करणे आवश्यक असतं त्याच प्रकारे ...

हे प्रश्न विचारा आणि त्याला स्पर्श न करता उत्तेजित करा

national news
शारीरिक संबंधात स्पर्शाचं आपलं महत्त्व आहे. हात, खांदे, गळा, ओठ यांना स्पर्श करून ...

10 रुपयात करा कॅल्शियमची कमतरता दूर, दूध न आवडणार्‍यासाठी ...

national news
अनेक लोक कॅल्शियमच्या कमीमुळे हाड कमजोर झाल्याची तक्रार करत असतात. तर आज आम्ही आपल्याला ...

शास्त्रानुसार जेवण केल्यानंतर हे कराच

national news
जेवण केल्यानंतर तोंडात पाणी टाकून चूळ भरतो. त्याला आपण गुळण्या करणे, असे म्हणतो. त्यामुळे ...

अधिक मांसाहार मृत्यूला आमंत्रण, जाणून घ्या कारण

national news
आपणं नॉनव्हेज खाण्याचे शौकिन असाल तर सावध व्हा. शोधकर्त्यांप्रमाणे अधिक मास खाल्ल्याने ...