शुक्रवार, 29 मार्च 2024
  1. लाईफस्टाईल
  2. »
  3. सखी
  4. »
  5. फॅशन
Written By वेबदुनिया|

'मड बाथ' उन्हाळ्यात वरदान

ND
शरीर हे पंचतत्त्वांनी बनलेले आहे. त्यात माती हे तत्त्व शरीराला थंडावा व शांतता प्रदान करते. माती हे जीवनाचे अस्तित्व आहे, मातीचा सरळ संबंध शरीराला व अंगाला नवजीवन देण्याशी आहे.

उन्हाळ्यात वातावरणाचे तापमान वाढल्याने शरीराला अत्याधिक उष्णता जाणवते आणि शरीरात माती तत्त्व कमी झाल्यामुळे घामोळ्या, त्वचेत जळजळ, काळेपणा, पिंपल्स या सारखे त्रास होतात. त्यासाठी माती स्नान (मड बाथ) केले जाते. मातीत अनेक गुणधर्म आहेत.

मातीचे गुणधर्म :
मातीत एक्टिनोमाइसिटेस नावाचे जिवाणू असतात. हे जिवाणू मोसमानुसार बदलतात. पाण्याच्या संपर्कात आल्याने तीव्र गतीने वाढू लागतात. मातीत जो मंद मंद सुवास येतो तो याच जीवाणुंमुळे. एक्टिनोमाइसिटेस हे जिवाणू शरीरासाठी लाभदायक असतात.

मड बाथ :
उन्हाळ्यात संपूर्ण मड बाथ घेतल्याने शरीरातील माती तत्त्वाची कमी पूर्ण होते. मडबाथने शरीराची रोगप्रतिरोधक क्षमता वाढते. शरीराच्या त्वचेवर किमान 1/2 इंचेच्या जवळपास मातीचा थर चढवण्यात येतो, तेव्हा त्वचेद्वारे ऑक्सिजन धारण करण्याची क्षमता वाढू लागते.

जागतिक आरोग्य संघटनेच्या (डब्ल्यूएचओ) सर्वेक्षणांद्वारे हे सिद्ध झाले आहे, की शुद्ध व ताजी माती कँसर, स्कीन सोरायसिस, एक्जिमा, क्षयरोग इत्यादींमध्ये फायदेशीर ठरते. याच बरोबर निद्रानाश व नैराश्याच्या स्थितीत माती सेरोटोनिनचा स्राव वाढल्याने गाढ झोप येण्यास मदत होते.

मड पॅ
मड पॅक बर्‍याच प्रकारचे असतात. पोटाचे मड पॅक, डोक्याचे मड पॅक इत्यादी. कुठल्याही अंगाचे निष्क्रिय होणे किंवा कमजोर पडल्यास त्या भागांवर मड पॅक लावून त्याला नवजीवन देण्यात येते.

ND
मातीचा वापर केल्याने शरीर तरुण व सुंदर दिसते. मातीचा प्रभाव पुरुषांच्या तुलनेत स्त्रियांवर अधिक पडतो. कारण स्त्रियांमध्ये प्रोजेस्ट्रॉन हार्मोनचे स्त्रावण होते जे मातीपासून अधिक प्रभावित होते.

हलक्या ओली मातीवर चालणे व चेहर्‍यावर मातीचे लेप लावून स्त्रिया स्वत:ला जास्त स्वस्थ व सुंदर बनवू शकतात.