Widgets Magazine
Widgets Magazine

अॅक्सेसरीज निवडताना करा स्टाइलचा विचार

कोणत्याही पेहरावाची शान वाढवण्यासाठी योग्य अॅक्सेसरीजची गरज पडते. पण ती योग्य आणि स्टाइलिश असली पाहिजे. चला जाणून घेऊ कोणत्या ड्रेसवर काय कॅरी केले तर उठून दिसेल:
* ऑफिस वेअर परिधानासोबत पेंडेंट, ब्रेसलेट किंवा इयररिंग काहीही घातलं तरी ते डेलिकेट असावं. ऑफिसमध्ये मोठ्या डिझाइनची ज्वेलरी घालणे टाळावे. कॉपोरेट जगात स्लीक डिझाइन शोभून दिसते.
*
Widgets Magazine
कॅज्युअल कलर्ससोबत बोल्ड कलर्स घालू शकता पण कॉम्बिनेशन योग्य असलं पाहिजे. लाइट कलरचे कपडे घातल्यावर त्यावर स्टाइलिश नेकलेस, मल्टीकलर ब्रेसलेट कॅरी करू शकता. याने कॅज्युअल लुक अजून बिनधास्त दिसेल.
*
इ‍वनिंग गाऊन विअर करताना अॅक्सेसरी लिमिटेड घाला. शीमर किंवा बोल्ड कलर्सचे परिधान असल्यास अॅक्सेसरीजचा मोह टाळा.
*
स्ट्रेट कट असलेले परिधान असल्यास कॉन्ट्रास्ट रंगाची ज्वेलरी सूट करेल.
*भरजरी परिधान असल्यास ज्वेलरीवर भर कमी द्या. कमीत कमी पण परिधानाला साजेशी ज्वेलरी घाला.
*
लग्नात पारंपरिक ज्वेलरीचा मोहा आवरायची गरज नाही. मॉडर्न आणि पारंपरिक ज्वेलरीचे कॉम्बिनेशनही जमेल. किंवा सोबर परिधान करून त्यावर हेवी ज्वेलरी घालू शकता.

Widgets Magazine

यावर अधिक वाचा :