शुक्रवार, 29 मार्च 2024
  1. लाईफस्टाईल
  2. सखी
  3. फॅशन
Written By

चेहर्‍याच्या शेपप्रमाणे निवडा गॉगल्स

उन्हात गॉगल्स लावून निघणे फॅशन नसून आवश्यकता आहे. परंतू फॅशनेबल गॉगल्सने व्यक्तिमत्त्वात भर पडते. जर आपण ही गॉगल्स घेयला जात असाल किंवा स्टाईलिश दिसण्याची इच्छा असेल तर हे टिप्स आपल्यासाठी आहे-
चेहर्‍याचा शेपप्रमाणे निवडा गॉगल्स
* आपल्या चेहर्‍याच्या त्वचेनुसार योग्य रंगाची फ्रेम निवडा. पांढरा आणि सिल्वर भडक दिसतो. हलका गोल्डन, काळा, ब्राउन रंगाची फ्रेम चांगली दिसते. तसेच गडद निळी फ्रेम चेहर्‍यावरील डाग लपवण्यात मदत करतं. लाल फ्रेम चंकी-फंकी असल्यामुळे रेग्युलर यूज करणे योग्य ठरणार नाही.
 
* ओव्हल फ्रेम ओव्हल चेहर्‍यावर सूट करत नाही. स्क्वेअर चेहर्‍यासाठी राउंड फ्रेम असलेले गॉगल्स छान दिसतात. तसेच राउंड किंवा ओव्हल शेप चेहर्‍यासाठी स्क्वेअर शेप फ्रेम सूट करेल.
 
* गॉगल्सच्या मधला भाग नाकावर येत असेल असे गॉगल्समध्ये चेहरा लांब दिसतो. अशात गाल आणि डोळ्यांचा काही भाग दिसत असतो. अशी फ्रेम लहान चेहरा असणार्‍यांसाठी योग्य असतो.

* जेव्हा गॉगल्स मधला भाग ग्लासेसच्या अगदी मधोमध असल्यास लांब चेहरा लहान दिसतो. हा भाग खाली असल्यासही चेहरा लहान दिसतो. लांब चेहरा असल्यास ही फ्रेम सूट करते.

* मोठ्या फ्रेमचे सनग्लासेस फॅशनमध्ये असले तरी आपण गॉगल्सचा आकार आपल्या चेहर्‍याप्रमाणे निवडावा. फॅशन म्हणून सामान्य चेहर्‍यावर मोठे गॉगल्स लावल्याने पूर्ण चेहरा झाकला जातो.
 
* गॉगल्स लावल्यावर आपली नाक खेचली जात असेल तर हा आकार आपल्यासाठी योग्य नाही. आपण जरा मोठ्या आकाराचा गॉगल निवडायला हवा.
 
ही काळजी घ्या
स्वस्त सनग्लासेस वापरू नये. नेहमी उत्तम क्वालिटीचे ग्लासेस खरेदी करा. स्वस्त ग्लासेसने डोळ्यांवर विपरित परिणाम होऊ शकतो.
 
गॉगल्स नेहमी त्याच्या कव्हरमध्ये ठेवावे आणि त्यांना नरम कपड्याने हलक्या हाताने पुसावे. ग्लासेसवर स्क्रेच पडता कामा नये.