नेलपॉलिश वापरता?

Last Modified शनिवार, 2 मार्च 2019 (10:46 IST)
महिला वर्गात लहान मुलींपासून ते प्रौढ महिलांपर्यंत नेलपेंट किंवा नेलपॉलिश लावणे ही आवडीची गोष्ट आहे. आजकाल तर नेल आर्ट नावाने विविध डिझाईन्स नखांवर नेलपेंटच्या साहाय्याने काढून घेण्याचा ट्रेंडही लोकप्रिय होतो आहे. सणासमारंभात हातावर मदी तसे नखांवर नेलपॉलिश हवे हे आता मगे पडले असून दररोज नखे नेलपेंटने रंगवायची फॅशन तरूणींमध्ये रूजली आहे. दर दोन तीन दिवसांनी वेगळ्या रंगाचे, वेगळ्या ढंगाचे नेलपॉलिश नखांवर चढविल्याशिवाय त्यांना चैन पडत नाही. मात्र असे वारंवार नेलपॉलिश लावणे नुकसानकारक ठरू शकते याची जाणीव किती जणींना असते कुणास ठाऊक?
नेलपेंट दर दोन-तीन दिवसांनी बदलायचे तर आधीचे नेलपेंट रिमूव्हरने काढून टाकावे लागते. या रिूमूव्हरमध्ये असलेल्या असिटोनमुळे नखांतील नैसर्गिक तेल व आर्द्रता शोषली जाते परिणामी नखे कोरडी पडतात. स्वस्तातले नेलपेंट वापरले जात असेल तर त्यात रसायनांचा वापर अधिक असतो व त्यानेही नखांचे नुकसान होते. नखे हा
तुमच्या आरोग्याचा आरसा असतो. पूर्वी डॉक्टर नखे व जीभ तपासूनच प्रकृतीचे निदान करत असत. त्यामुळे नेलपॉलिश वापरताना कमी रसायने असतील हे तपासून मगच वापरले जावे ही काळजी घ्यायला हवी.
आजकाल व्हिटॅमिन असलेली नेलपॉलिशही बाजारात आली आहेत. ती नखांना पोषण देतात असा दावा केला जातो. मात्र त्यातील सत्यता पडताळूनच अशी नेलपॉलिश वापरावीत. नेलपॉलिश सतत वापरण्याने नखे पातळ होतात व तुटतात. त्यामुळे अधूनमधून नेलपॉलिशला पूर्ण सुटी द्यावी. रोज किमान 10 मिनिटे तरी नखे कोमटपाण्यात बुडवून ठेवावीत. यामुळे नखांत पुरेशी आर्द्रता राहते व ती शुष्क होत नाहीत. अनेकदा फंगसमुळे नखे पिवळी पडतात. त्यामुळे बेसकोट लावल्याशिवाय नखांवर नेलपॉलिश लावू नये.
अनेकदा नवीन नेलपॉलिश लावताना जुने खरडून काढले जाते. हे पूर्ण टाळावे. खरडल्यामुळे नखांचे वरचे आवरण कमजोर बनते व नखे अधिक नाजूक होतात व भेगाळतात.

हे दुष्परिणाम लक्षात घेऊनच नेलपॉलिश किती वापरायचे याचा निर्णय घेणे योग्य ठरते.


यावर अधिक वाचा :

Corona virus ची भीती, काय प्रत्येकाला मास्क लावणे आवश्यक, ...

Corona virus ची भीती, काय प्रत्येकाला मास्क लावणे आवश्यक, आरोग्य मंत्रालयाने जारी केले निर्देश
भारतात कोरोना व्हायरसच्या रुग्णांची संख्या वाढत असून केंद्र सरकारने यासाठी तयारी केलेली ...

महाराष्ट्रात कोरोनाचा पहिला बळी

महाराष्ट्रात कोरोनाचा पहिला बळी
देशभरात करोना व्हायरसमुळे काळजीचं वातरवारण पसरलं असताना महाराष्ट्रात या आजरामुळे पहिल्या ...

राज्यात कोरोना रुग्ण संख्या ३९, १०८ लोक विलगिकरण कक्षात

राज्यात कोरोना रुग्ण संख्या ३९, १०८ लोक विलगिकरण कक्षात
राज्यात यवतमाळ येथे १ आणि नवी मुंबई येथे १ असे २ कोरोना रुग्ण आढळून आले. यामुळे राज्यातील ...

कोरोना रोखण्यासाठी राज्य सरकारचे 11 मोठे निर्णय माहीत हवेत

कोरोना रोखण्यासाठी राज्य सरकारचे 11 मोठे निर्णय  माहीत हवेत
– राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका तीन महिने पुढे ढकलल्या. – ग्रामीण ...

पुणे : दुकाने 3 दिवस बंद

पुणे : दुकाने 3 दिवस बंद
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर पुण्यातली दुकानं पुढील तीन दिवस बंद राहणार आहेत. कोरोनाचा फैलाव ...

झटपट किचन टिप्स

झटपट किचन टिप्स
गृहिणींना रोजचा स्वंपाक करताना काही छोट्या – मोठ्या अडचणी येतात. अशावेळी नेमके काय करावे ...

रोग प्रतिकारक शक्ती वाढवू या... हळदीचे गुणधर्म जाणून घेऊ ...

रोग प्रतिकारक शक्ती वाढवू या... हळदीचे गुणधर्म जाणून घेऊ या...
आपल्याला लहानपणापासून शिकवले जाते की आरोग्य चांगले असेल तर काहीही करता येतं म्हणजे ...

ब्रोकोली गुणांचा खजिना....

ब्रोकोली गुणांचा खजिना....
ब्रोकोली ही लोकप्रिय भाजी नाही. बऱ्याच लोकांना ह्या बद्दल जास्त माहिती नाही. पण ब्रोकोली ...

सोप्या पध्दतीने घरीच पटकन तयार करा कुरकुरीत केळीचे वेफर्स

सोप्या पध्दतीने घरीच पटकन तयार करा कुरकुरीत केळीचे वेफर्स
सर्वात आधी कच्च्या केळ्यांची सालं काढून घ्या. एका बाऊलमध्ये बर्फाचं पाणी घेऊन त्यात मीठ ...

आयुर्वेद आणि स्वयंपाकाची भांडी

आयुर्वेद आणि स्वयंपाकाची भांडी
आयुर्वेद आणि स्वयंपाकासाठी वापरली जाणारी भांडी यांचाही जवळचा संबंध आहे. कारण ...