गुरूवार, 25 एप्रिल 2024
  1. लाईफस्टाईल
  2. सखी
  3. फॅशन
Written By
Last Modified: शनिवार, 31 डिसेंबर 2016 (14:54 IST)

स्टायलिश विंटर शूज...

थंडीत ऊबदार कपडे अंगावर चढत असले तरी पायाकंडे विशेष लक्ष दिलं जात नाही. पण हीच बाब काळजीचं कारण ठरते कारण पायांनाही ऊब  हवी. थंडीत ते उघडे पडता कामा नयेत. यासाठी ऊबदार पादत्राणं घेता येतील. पादत्राणं ऊबदार असण्यासोबतच स्टायलिशही हवी. स्टायलिश पादत्राणांचे हे काही ऑप्शन्स... 
 
* प्रिटेंड, स्नीकर्समुळे तुम्हाला कूल लूक मिळेल. स्वेट शर्ट, जीन्स अगदी कशावरही हे बूट चालून जातील. 
 
* स्मार्टलूकसाठी हिल्सवाले शूज ट्राय करता येतील. याचा लूक ही हटके आहे. पिंक, व्हायलेट कलर्ससोबत एक्सपरिमेंट करता येईल. 
 
* पार्टीला जायचं असेल तर हिल्सवाल्या ट्रेंडी सँडल्स घ्या. पेन्सिल हिल्सही चालून जातील. 
 
* कॅज्युआल वेजेझ शूज तुमच्या पायांना थंडीपासून संरक्षण देतील.  जीन्स, स्कर्ट, ड्रेसवर हे चालून जातील. पायांनाही त्रास होणार नाही. 
 
* नॉर्मल बूटही ट्राय करता येतील. कॅज्युअल ओकेजनला ते चालून जातील. 
 
* भारतीय पारंपरिक पादत्राणं आवडत असतील तर मोजडी ट्राय करायला काहीच हरकत नाही.