शुक्रवार, 19 एप्रिल 2024
  1. लाईफस्टाईल
  2. सखी
  3. फॅशन
Written By

आता दागिने सजवा नेल पेंटच्या साहाय्याने

इमिटेशन ज्वेलरीची खरेदी बहुधा मॅचिंग ड्रेस, साडी याकरिताच केली जाते. बर्‍याचदा परफेक्ट मॅचिंग मिळत नाही. अशावेळी जे दागिने खरेदी केलेले असतात. त्यावरती हव्या त्या रंगाच्या पारदर्शक नेल पेंटचे थर देऊन मॅचिंग ज्वेलरी घरच्या घरी बनविता येईल.
 
याकरिता जे नेल पेंट वापरावे लागते ते चागल्या दर्जाचे असावे. नेल पेंटचा थर देताना सर्वप्रथम दागिन्यांच्या एका बाजूला छोटासा स्पॉट रंगवावा. रंगसंगती आकर्षक वाटली, पेंट योग्य प्रकारे बसतोय असे वाटले, तरच संपूर्ण दागिना नेल पेंटने रंगवा. नेकलेस, दोन-तीन वेढणीच्या बांगड्या, अंगठय़ा, अँकलेट्स, पैंजण आदी दागिन्यांवर हा प्रयोग करता येऊ शकेल. शक्यतो नेकलेसच्या मधल्या पदरावर हलक्या हाताने पेंटिंगचे काम करा. नेल रिमुव्हरचा उपयोग करून नको असणारा नेल पेंट दागिन्यांपासून काढता येतो. अडगळीत पडलेल्या दागिन्यांवरही हा प्रयोग करून नवी झळाळी देता येईल.