शुक्रवार, 19 एप्रिल 2024
  1. लाईफस्टाईल
  2. सखी
  3. फॅशन
Written By

कफ ब्रेसलेट घालून दिसा स्टाईलिश

साधारण ड्रेसमध्ये ही आपणं स्पेशल अॅक्सेसरीजमुळे उठून दिसू शकता. सध्या फॅशनमध्ये असलेले कफ ब्रेसलेट आपल्या पर्सनालिटीला एक वेगळीच स्टाईल प्रदान करेल. याची विशेषता म्हणजे हे वेस्टर्न आणि एथनिक  दोन्ही ड्रेसेसबरोबर उठून दिसतात.
 
जर आपण रंगीत किंवा प्रिंटेड ड्रेस घातला असेल तर प्लेन गोल्ड किंवा सिल्वर ब्रेसलेट घाला. आणि आपणं सिंपल हलक्या रंगाच्या ड्रेस घातला असल्यास फ्लोरल, ब्राइट किंवा बोल्ड प्रिंट्स असलेले ब्रेसलेट घालू शकता.  
 
एथनिक ड्रेसेसबरोबरही प्लेन किंवा टेक्शर गोल्ड ब्रेसलट मस्त दिसेल. किंवा याच्याबरोबर आपण डायमंड किंवा मोती लागलेले कफ ब्रेसलेटही घालू शकता.
 
सध्या स्टोन्स, लेदर, गोल्ड, सिल्वर मेटल, बीड्स व इतर मटेरियल्सने तयार केलेले कफ ब्रेसलेट्स फॅशनमध्ये आहे.