शनिवार, 20 एप्रिल 2024
  1. लाईफस्टाईल
  2. सखी
  3. फॅशन
Written By वेबदुनिया|

कॉटनच्या कुर्त्याचा जमाना

आधुनिक समजल्या जाणार्‍या जमान्यात केव्हा कशाची 'फॅशन' येईल, हे सांगणे कठीण आहे. आज कॉटन कपड्याची फॅशन आहे. उद्याचा दिवस कोणत्या फॅशनचा असेल, हे सांगता येणार नाही. बाजारात आकर्षक कॉटनचे कुर्ते आले आहेत. त्यावरील ऐम्राडरी वर्क व डिझाईनमुळे ते अबालवृध्दांना आकर्षित करत आहेत. ज‍िन्स वापरणार्‍या तरूणींची तर कॉटनचा कुर्ता ही पहिली पसंत आहे.

कॉटनच्या कपड्यांना ग्राहकांकडून मिळणारा प्रतिसाद पाहता आकर्षक रेंजमध्ये तसेच विविध व्हराईटीजमध्ये कपडे बाजारात उपलब्ध झाली आहेत. सहसा कॉटन कुर्ते उन्हाळ्यात वापले जायचे. मात्र आता तर प्रत्येकऋतुमध्ये कॉटन कुर्त्यांचा वापर केला जाताना दिसतो. त्यात निळा, हिरवा, ‍पिवळा, गुलाबी, भगवा रंगातील पाश्चात्य टच असलेल्या कुर्त्यांना मागणी आहे.

तरूण-तरूणी जीन्सवर आकर्षक फॅशनेबल कॉटन कुर्ता परिधान करत असतात. खादीच्या कुर्त्यानाही चांगली डिमांड आहे. कॉटन कुर्ता 350 रूपयांपासून ते 2000 रूपयांपर्यंतच्या रेंजमध्ये बाजारात उपलब्ध आहेत.