शुक्रवार, 19 एप्रिल 2024
  1. लाईफस्टाईल
  2. सखी
  3. फॅशन
Written By

पावसाळ्यात घाला असे कपडे

ज्यांना आरामदायक फील करायचा असतं ते नेहमी सीझनप्रमाणे कपड्यांची निवड करतात. जसे थंडीत जाड तर गरमीच्या सीझनमध्ये पातळ आणि सुती कपडे घालणे योग्य आहे तसेच पावसाळ्यातही योग्य कपडे घातले की मान्सूनचा मजांचं वेगळा येतो.

जार्जेट किंवा शिफॉन: अगदी सिनेमात दाखविण्यात येत असलेली शिफॉनची पातळ साडी खरोखर पावसाळ्यात छानच दिसते आणि ओली झाली तरी वाळतेही लगेच पण या कपड्यांमध्ये सर्वात त्रासदायक पॉइंटच हा आहे की हे फार पारदर्शी असतात. जरासा ओलावा किंवा पाऊस लागल्याने लाजिरवाणी परिस्थितीला सामोरे जावं लागू शकतं. म्हणून वातावरण बघूनच अश्या कपड्यांची निवड करा.


 
नायलॉन किंवा सिन्थेटिक: हे फॅब्रिक या सीझनसाठी उपयुक्त आणि आरामदायक आहे. हे कापड पाणी टिकू देत नसून लवकर वाळतं.

टाइट कपडे नको: पावसाळ्यात कोणतेही कापड घाला पण ते खूप टाइट नसलं पाहिजे. याने ओले झाल्यावर हे पारदर्शी होतात आणि आपले आतले कपडेही दिसू लागतात.



 
जवळ स्कार्फ असू द्या: इतर दिवसांमध्ये आपल्याला लेगिंग कुर्त्यावर किंवा जीन्स टॉपवर स्टोल किंवा स्कार्फ घेण्याची गरज नसेल भासत पण पावसाळ्यात आपल्या जवळ स्कार्फ किंवा स्टोल असू द्या.

 

गडद रंग निवडा: पावसाळ्यात रंगीत कपडे खूप छान दिसतात. या सीझनमध्ये आपण लाल, पिवळा, हिरवा अश्या रंगाचे कपडे घालून प्रकृतीचा आनंद घेऊ शकता.


 
फ्लोरल प्रिंट निवडा: पावसाळ्यात चटक रंगाचे फ्लोरल प्रिंट उठून दिसतात. मोठे प्रिंट असलेले कुर्ते किंवा टॉप जे आपणं इतर सीझनमध्ये घालण्याआधी दहा वेळा विचार करतो ते या पावसाळ्यात बिंदास घालू शकता.