शुक्रवार, 29 मार्च 2024
  1. लाईफस्टाईल
  2. सखी
  3. फॅशन
Written By
Last Modified: सोमवार, 21 जुलै 2014 (16:59 IST)

पिंट्रेड हेअरचा ट्रेंड

हल्ली केस कलर करण्याचा ट्रेंड वाढतोय. त्याही पुढे जाऊन पिंट्रेड हेअरचा बोलबाला आहे. यापूर्वी कपडे, अँक्सेसरीज, नखं यात पिंट्र फॅशनची सार्‍यांनाच माहिती होती. आता केसांमध्येही ही फॅशन दिसून येत आहे.

केसांबाबत नवनवीन प्रयोग करणार्‍या तरुणींसाठी पिंट्रेड हेअर हा उत्तम पर्याय आहे. यामध्ये लेपर्ड प्रिंट, चिता पिंट्र, झेब्रा प्रिंट आदी प्रकार उपलब्ध आहेत. एवढेच नव्हे तर यात वेगवेगळ्या रंगांचाही वापर केला जातो. त्यामध्ये खास करून इलेक्ट्रिक ब्ल्यू, निऑन पिंक, ब्राऊन आणि मोनोक्रेम या रंगांचा वापर केला जातो.

केस कलर करण्याची इच्छा नसेल तर आर्टिफिशियल पिंट्रेड हेअर सेक्शनचा वापर करता येईल. सध्या बाजारात पिंट्रेड हेअर एक्स्टेंशन उपलब्ध आहेत. दररोज वेगळा लूक मिळवण्यासाठी वेगवेगळ्या प्रिंट्सच्या हेअर एक्स्टेंशनचा वापर करता येणेही सहज शक्य आहे.