शुक्रवार, 29 मार्च 2024
  1. लाईफस्टाईल
  2. सखी
  3. फॅशन
Written By
Last Updated : सोमवार, 12 ऑक्टोबर 2015 (16:57 IST)

फेस्टिवलमध्ये नखं दिसावे आकर्षक

सणासुदीच्या वेळी कपडे, दागिने, कॉस्मेटिक या सर्वांकडे लक्ष देताना काही गोष्टींकडे दुर्लक्ष होतं. त्यातून एक आहे नखं. पण असं करू नका, सध्याच्या काळात स्टाइलिश नखांना खूप महत्त्व आहे. नेल आर्टने नखांचे सौंदर्य वाढवता येतं. नखं आकर्षक दिसावे यासाठी काही टिप्स:
 
ट्रॅडिशनल फेस्टिवल टाइममध्ये नखांनाही ट्रॅडिशनल लुक द्या. नखांवर हत्ती, मोर पीस किंवा देवी‍चे चित्र असे काही नक्षीकाम करा.



कोणते ही आर्ट काढण्याआधी पांढर्‍या रंगाच्या नेलपॉलिशने बेस तयार करा व डिझाइन काढून झाली की वरून ट्रान्सपरंट नेलपॉलिशचा कोट द्या.

रांगोळीचा लुक देण्यासाठी ठिपकेही काढता येतील किंवा ट्रायबल आर्ट, वरली प्रिंट नखांवर साकारता येतील.


 
कोणत्याही आर्टवर शायनिंगसाठी ग्लिटर फ्रेंच टिपचा वापर करू शकता.