गुरूवार, 25 एप्रिल 2024
  1. लाईफस्टाईल
  2. »
  3. सखी
  4. »
  5. फॅशन
Written By
Last Modified: सोमवार, 2 जून 2014 (17:22 IST)

फ्रॉक की कुर्ता?

लहाणपणीच्या फ्रॉक्समध्ये थोडासा बदल हूऊन फ्रॉक स्टाईलचे कुर्ते आता बाजारात आलेत. फ्रॉक्स नॉस्टॅल्जिया जागवण्यार्‍या या कुर्त्याचं आपलं स्टाईल स्टेटमेंटही भन्नाट आहे.
 

शाळेतले ते टिपिकल बंदवाले टॉप्स मिस न करणारी मुलगी शोधून सापडणार नाही: छानशी फ्रिल, मागे बांधलेले बंद असे फॉक दिसतातही खूप क्यूट.

आता लेगिंग्ज किंवा जिंसवरही असे फॉक घालण्याची फॅशन परत आलीय. बाजारात एक चक्कर टाकतील तर फ्रॉकस्टाईलनं शिवलेल्या कुर्त्यांची भरपूर व्हेरायटी पाहायला मिळेल.

हेफ्रॉक स्टाईल कुडते सिल्क, कॉटन, जॉर्जेट कोणत्याही मटेरिअलमध्ये बनवली असले तरी आरामदायी असतात. त्यातही अर्थात कॉटेनचे जास्त सुटसुटीत असतात. जाडसार कॉटनपासून बनवलेले कुडते जास्त ट्रेंडमध्ये आहेत.

नेक डिजाईंस- या कुडत्यानमंध्ये नहमीची कॉलर, स्टँड कॉलर, कुर्ता पट्टी, डिझायनर किंवा एम्ब्रॉयडरी केलेली कॉलर,डीप नेक, बटनांशी सुशोभित केलेले नेक, त्याशिवाय मोती, दोरी नेक यांची चलती आहे. वेगवेगळ्या नेक डिझाईंसमुळे या फ्रॉक कुडत्यांची रंगात आणखी खुलून दिसते.

स्लीव्हज- थ्री फोर्थ स्लीव्हज सध्या खूप फॅशनमध्ये आहेत. बॉडिगार्ड सिनेमापासून करिनानं आणलेली ही फॅशन नंतर सोनाक्षीसारख्या हिरोईंसनीही चालू ठेवली आहे. फ्रॉक कुर्त्यावरही थ्री फोर्थ स्लीव्हज सुरेख दिसतात. त्याशिवाय बलून स्लीव्हज, स्लीव्हलेस, मेगा स्लीव्हज, फुल स्लीव्हज, क्रोशाचे स्लीव्हज छान दिसतात. वूलन तसंच फ्रिलचे स्वीव्हज फ्रॉक स्टाईलला सूट होतात.

रंग- सध्या सगळीकडेच मल्टीकलर्सचा ट्रेंड आहे. तोच य स्टाईलमध्येही दिसून येतो. जांभळा, शॉकिंग यलोअसे गडद रंगही मुली बिनधास्तपणे कॅरी करताना दिसतात. काळा रंगतर ऑल टाईम फेव्हरेटमध्ये येताच.

ओढणी- फ्रॉक कुर्त्यावर ओढणी घ्यायची फारशी गरज नसते. तरीही घ्यायचा झाल्यास स्टोलला पसंती द्यावी. नेटच्या लांब ओढण्याही, शेडेड ओढण्याही यावर खूप वापरल्या जातात. मात्र खूप जाड आणि रूंद ओढण्या यावर चांगल्या दिसत नाहीत.

डिझाईंस- या स्टाईलच्या कुर्त्यांनाअसलेली अम्ब्रेला स्टाईल खूप क्यूटदिसते. थोड्या जाड असाल तर अॅपल शेप कुडता म्हणजेच खालचा कट गोलाकार असलेला कुडता छान दिसेल. त्याशिवाय पार्टिशन डिझाईनही इन आहे. त्यात कुडत्याला मधोमध दोन भाग करून त्यातल्या एकावर सलवारलामॅचिंग किंवा दुसंरच डिझाइन केलेलं असतं. साईड डिझाईन्ही फॅशनमध्ये आहे. साइड डिझाइन, बॉटमला केलेलं काम आणि त्याला मोठ्या बॉर्डर्सची जोडाअशी कॉम्बिनेशंसही हिट आहेत. त्याला मोती, मोठी लेस यांची असेल तरी ते छान दिसतं.