शुक्रवार, 29 मार्च 2024
  1. लाईफस्टाईल
  2. »
  3. सखी
  4. »
  5. फॅशन
Written By वार्ता|

महिलांनो, लिपस्टिक लावणे बंद करा!

महिलांनो कर्करोग होऊ नये असे वाटत असेल तर पहिल्यांदा लिपस्टिक लावणे बंद करा. हा आम्ही दिलेला सल्ला नसून शास्त्रज्ञांनी दिलेला इशारा आहे.

लिपस्टिकमध्ये अनेक रासायनिक पदार्थ सापडले आहेत. त्यामुळे स्तनाचा कर्करोग होऊ शकतो. ब्रिटनमधील डेली मेलने यासंदर्भातील वृत्त दिले आहे. फिलाडेल्फियाच्या फॉक्स चेंज कॅन्सर सेंटरने यासंदर्भात संशोधन केले असून त्या आधारे ही माहिती देण्यात आली आहे. लिपस्टिकमध्ये ब्युटाईल बेंझाईल थायलेट (बीपीपी) नावाचा एक रासायनिक पदार्थ सापडतो. त्यामुळे स्तन उतींच्या विकासात अडथळा उत्पन्न होतो. लिपस्टिक चमकदार बनविण्यासाठी अनेक कंपन्या बीबीपीचा वापर करतात. ब्रिटनमधील पाचपैकी चार सौंदर्य प्रसाधनांमध्ये या रसायनाचा वापर केला जातो, असे पर्यावरणवादी महिला संघटनांचे म्हणणे आहे.