गुरूवार, 25 एप्रिल 2024
  1. लाईफस्टाईल
  2. सखी
  3. फॅशन
Written By वेबदुनिया|

मेकअप ट्रिक्स अन् टिप्स, कंसिलर!

खरे सौंदर्य मनात असते. चेहर्‍यावर किंवा शरीरावर नव्हे, असे आपण कितीही म्हणत असलो, तरी एखादी सुंदर मुलगी बाजूने जात असली की, आपली मान आपोआप वळतेच. ऑफिसमध्ये एखादी मुलगी सुंदर असेल तर दिवस कसा उजळून निघाल्यासारखा वाटतो, मन प्रसन्न राहते! म्हणूनच प्रत्येकाला सुंदर दिसावे असे वाटत असते. स्वत:साठी नव्हे तर इतरांचा दिवस प्रसन्न करण्यासाठी! अन् स्त्रियांना तर जात्याच सौंदर्याची देणगी मिळालेली असते. ते जितके अधिक खुलेल तितके चांगले. 

खरंतर आजच्या धावपळीच्या जगण्यात कुठलीही गोष्ट अगदी वाटेल तेवढा वेळ घालवून करताच येत नाही. मग रोजचा मेकअप देखील याला कसा अपवाद असणार? म्हणून अगदी सहज करता येईल अशा साध्यासोप्या मेकअप ट्रिक्स अन् टिप्स.

कन्सीलर
कन्सीलर म्हणजे चेहर्‍यातील दोष लपवणारे प्रसाधन. चेहर्‍यावरे डाग वांगाचे ठिपके, काळी वर्तळे, उठवून दिसणार्‍या शिरा, पुटकुळ्या, जन्मखुणा हे सर्व कन्सीलर मुळे लपवते जाते, आणि चेहर्‍याची त्वचा नितळ दिसू लागते. कन्सीलर हे फाउंडेशन पेक्षा घट असते. ते क्रिमी लिक्विड, स्टिक आणि क्रीम या स्वरूपात मॅट फिनीशमध्ये मिळते.

कन्सीलर खरेदी करताना ते तुमच्या नॅचरल स्किन टोनेच घ्यावे. किंवा तचुमच्या फाउंडेशन पेक्षा एकदोन शेड फिक्क घ्यावे. म्हणजे हवा तो लूक मिळवण्यासाठी कन्सीलर व फाउंडेशन या दोन्हीचा एकत्र परिणाम दिसून येईल व चेहर्‍यावरचे दोष झाकता येतील.

त्वचा कोरडी असेल तर लिक्विड कन्सीलर वापरा.
डोळ्यांभोवतीची काळी वर्तुळे लिक्विड कन्सीलर मुळे व्यवस्थित झालकी जातात. काळी वर्दुळे झाकण्यासाठी पापण्यांवर व डोळ्याखाली दोन्ही ठिकाणी कन्सीलर लावावे व आपल्या त्वचेशी ते एकरूप करावे.

चेहर्‍यावर व्रण, पुटकुळ्या किंवा करचटल्याच्या खुणा असतील तर स्टिक कन्सीलर वापरावे. कन्सीलर लावताना पॅट अॅड ब्लेंड टेक्रीक वापरावे.

क्रीम कन्सिस्टन्सीचे कन्सीलर सर्व त्वचा प्रकाराकरीत्या उपुयक्त आहे. कारण ते त्वचेशी सहजपणे एकरूप होते.

त्वचा नितळ दिसण्यासाठी बोटांवर कन्सीलरचा ठिपका घेऊन चेहर्‍याचा भाग ज्या ठिकाणी खराब आहे. कारण ते त्वचेशी सहजपणे एकरूप होते.

त्वचा नितळ दिसण्यासाठी बोटांवर कन्सीलरचा ठिपका घेऊन चेहर्‍याचा भाग ज्या ठिकाणी खराब आहे तेथे हळूहळू थापट्या मारत कन्सीलर मुखावे.

लिक्विड किंवा सॉलीड फाउंडेशन वापरणार असाल तर प्रथम फाउंडेशन लावा त्यावर कन्सीलर लावा, पण जर तुम्ही क्रीम किंवा पावडर फाउंडेशन वापरणार असाल तर प्रथम कन्सलर लावून त्यावर फाउंडेशन लावा. चेहर्‍याच्या नाजूक भागावर उदा डोळ्यांखाली क्रिमी कन्सीलर वापरावे. गाल किंवा कपाळावर सॉलीड कन्सीलर वापरावे.

हिरवा, गुलाबी किंवा पांढरा बेसकलर असलेले कन्सीलर कधीही वापरू नये कारण ते त्वचेच्या रंगाशी मिसळून जात नाहीत व चेहर्‍यातील दोष झाकले जाण्याऐवजी ठळकपणे दिसून येतात.