शनिवार, 20 एप्रिल 2024
  1. लाईफस्टाईल
  2. »
  3. सखी
  4. »
  5. फॅशन
Written By वेबदुनिया|

राजस्थानी मोजडीची गोष्टच न्यारी

ND
पारंपरिक राजस्थानी मोजडी प्रत्येकाला आकर्षित करते. राजे महाराजे यांनी घातलेल्या मोजडींना युवावर्गातून मोठी मागणी आहे. जुन्या काळातील मोजडीला फॅशनच्या जमान्यातही चांगले दिवस आले आहेत. तरुणच काय तर तरुणीकडून राजस्थानी मोजडीची मोठ्या प्रमाणात मागणी होत आहे.

भारतीयासह विदेशी पर्यटकांना राजस्थानी मोजडी ही आकर्षित करताना दिसत आहे. राजस्थानी मोजडीचे मुख्य आकर्षण म्हणजे तिची पारंपरिक बनावट होय. राजस्थानातील स्थानिक कारागीर मोजडींवर रंगबिरंगी धाग्यांनी सुंदर नक्षी तयार करत असतात. अशी आकर्षक मोजडी पाहता क्षणी त्या खरेदी केल्याशिवाय कोण बरा थांबेल!

कुर्ता-पायजमा तसेच शेरवानी घातलेल्या तरुणांच्या सौंदर्यात मोजडी भर घालते. महिलादेखील साडीवर व तरुणी जीन्स व टॉपवर मोजडी वापरतात.

बाजारात 150 रुपयांपासून ते 2000 रुपयांपर्यंत मोजड्या उपलब्ध आहेत. रस्त्यावरून जाणार्‍यांना नागरिकांना दुकानातील शोकेसमध्ये ठेवलेल्या विविध रंगीबेरंगी व आकर्षक डिझाइनमधील मोजडी बोलवताना दिसतात. लग्न व कार्यक्रमांमध्ये बहुतेक
जणांच्या पायात राजस्थानी मोजडी दिसते. उंच व्यक्तींना तर मोजडी सुंदरच दिसते.

कोणत्या कपड्यांवर वापराल मोजडी?
तरुण कुर्ता -पायजमा व शेरवाणीवर तर तरुणीने चूड़ीदार, सलवार कुर्ता, जीन्स व टॉपवर वापरल्याने त्यांच्या पोषाखात परीपूर्णता येते.

काही महत्त्वाच्या गोष्टी :-
* मोजडी खरेदी करताना हे लक्षात घ्या की, ती पायात घट्ट बसत नाही ना! त्यासाठी थोडी सैल बसेल अशीच मोजडीच खरेदी करा.

* काही दिवस मोजडी वापरल्यानंतर पायाला फोड येतात. खास मराठीत आपण त्याला चप्पल चावली, असे म्हणतो. त्यासाठी मोजडी ज्या ठिकाणाहून त्रास देत आहे त्या जागी मेण घासावे व त्यानंतर त्या जागी लावावे.

* पांढरा कुर्ता-पायजम्यावर राखाडी व क्रीम रंगाची मोजडी एक वेळा अवश्य ट्राय करा.

* सलवार-कुर्तावर तर मोजडी घालणे विसरू नका.

* मोजडी विकत घेताना ती पायात घालून दुकानातच चालून पाहिले पाहिजे.